विकासकामातील अडथळा ठरणारे अतिक्रमण काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:30 AM2021-06-16T04:30:10+5:302021-06-16T04:30:10+5:30
वैराग : उपबाजार समितीमधील विकास करताना अतिक्रमणात असलेली आडत दुकाने काढण्याचा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार राजेंद्र ...
वैराग : उपबाजार समितीमधील विकास करताना अतिक्रमणात असलेली आडत दुकाने काढण्याचा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यापाऱ्यांच्या बैठकीत दिला.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी दिलीप गांधी होते. राऊत म्हणाले, बार्शी बाजार समितीप्रमाणेच वैराग बाजार समितीमधील विकास करणार आहे. मात्र, विकास करताना याठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेले अतिक्रम काढावे लागणार आहे. अतिक्रमण केलेल्या व्यापा-यांनी बसून मार्ग काढावा असा सल्लाही दिला. याचबरोबर बार्शी मुख्यबाजार समितीप्रमाणे प्रत्येकाच्या दुकानापुढे पाण्याची सोय, अंतर्गत चांगले रस्ते तसेच १ हजार मेट्रिकचे १.५ कोटींचे बेदाना शेड, ३.५ कोटींचे द्राक्ष शीतगृह व जनावरांना बाजारात निवारा शेड, शॉंपिंग सेंटर याकरिता १.३६ कोटी तर वजनकाटा, सुरक्षा भिंत सर्व परिसरात भुयारी गटारी याकरिता सात कोटी रुपये मंजूर केल्याचे सांगितले. दरम्यान, वैराग बाजार समितीत राऊत यांच्या हस्ते येथे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मार्केट कमिटीचे चेअरमन रणवीर राऊत, माजी सरपंच संतोष निंबाळकर, दिलीप गांधी, रावसाहेब मणगिरे, बाबासाहेब कथले, वैजिनाथ आदमाने, भारत पंके, सुर्डीचे सरपंच विनायक डोईफोडे, बाजार समिती संचालक झुंबर जाधव, नानासाहेब धायगुडे, महेश उत्तम अंकुश उपस्थित होते.
---
फोटो :१३ वैराग
वैराग बाजार समितीत व्यापाऱ्यांच्या बैठकीनंतर वृक्षारोपण करताना