सोलापूर मनपा सभेत येणार शहराच्या पर्यावरण स्थितीचा अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:17 PM2018-04-15T12:17:51+5:302018-04-15T12:17:51+5:30
दुसºयांदा प्रयोग करणार, धुळमुक्तीसाठी जादा झाडे लावण्याचा प्रस्ताव
सोलापूर : मनपा सभेत शहराच्या पर्यावरण स्थितीचा अहवाल देण्याची तयारी मनपा प्रशासनाने केली आहे. २२ वर्षांत दुसºयांदा पर्यावरण स्थितीचा अहवाल सभेसमोर येणार आहे.
शहरातील पर्यावरण स्थितीचा अहवाल शासनाकडे वेळोवेळी पाठविला जातो. दरवर्षी असा अहवाल मनपाच्या सभेत ३१ जुलैपूर्वी ठेवण्यात यावा अशी मनपा कायद्यात (६७ अ) तरतूद आहे. यापूर्वी आयुक्त राव यांच्या कालावधीत असा अहवाल मनपा सभेपुढे ठेवण्यात आला होता. त्यानंतर असा अहवाल पाठविण्याकडे कोणीच लक्ष दिले नव्हते. भाजपचे ज्येष्ठ सदस्य प्रभाकर जामगुंडी यांनी आयुक्त डॉ. अनिवाश ढाकणे यांची भेट घेऊन असा अहवाल सभेकडे पाठवावा अशी विनंती केली आहे. त्याप्रमाणे आयुक्तांनी प्रशासनाला असा अहवाल तयार करण्यासंबंधी सूचना दिल्या आहेत.
पर्यावरण अहवालात शहराला होणारा पाणी दूषित पुरवठा, हवा, आवाज आणि धुळीच्या मोजमापाचा विचार केला जातो. शहराला होणाºया पाणीपुरवठ्याबाबत दररोज नोंदी घेतल्या जातात. हवा आणि धुळीचे प्रदूषण मोजण्यासाठी डफरीन चौकात शासनानेच यंत्रणा बसविली आहे. उत्सवावेळी ध्वनीच्या प्रदूषणांची मोजदाद केली जाते.
हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने करण्यात येणाºया उपाययोजनांसंबंधीचा उहापोह या अहवालात घ्यावयाचा आहे. आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पदभार घेतल्यापासून शहरातील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी विविध प्रयोग राबविण्याचे नियोजन केले आहे. यंदा पावसाळ्यात सामाजिक वनीकरण व इतर संस्थांच्या माध्यमातून जास्तीजास्त झाडे लावण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी प्राणी संग्रहालय बाग आणि उद्यान विभागात रोपे तयार करण्यात येत आहेत. शहरातील मोकळ्या जागेत वनराई फुलविण्याचा प्रयत्न राहणार आहे.
या अनुषंगाने मोकळ्या जागांचा शोध सुरू झाला आहे. सोलापुरात धुळीचे प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी अमृत योजनेतून विकसीत करण्यात येणाºया बागांमध्ये २ हजार झाडे, इंद्रभुवन बागेत २00 झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. यंदाच्या पावसाळ्यात शहरातील मोकळ्या जागांमध्ये जास्तीतजास्त जंगल फुलविण्याचा प्रयत्न आहे. अक्कलकोट रोड एमआयडीसीतील ११ एकर जागेवर आहे त्या स्थितीत वनराई फुलविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्याचबराबेर रस्ते, शाळा, बागांमध्ये झाडे लावण्यात येणार आहेत.
शहरातील मोकळ्या जागा फुलविण्याचा प्रयत्न
सोलापुरात धुळीचे प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी अमृत योजनेतून विकसित करण्यात येणाºया बागांमध्ये २ हजार झाडे, इंद्रभुवन बागेत २00 झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. यंदाच्या पावसाळ्यात शहरातील मोकळ्या जागांमध्ये जास्तीतजास्त जंगल फुलविण्याचा प्रयत्न आहे. अक्कलकोट रोड एमआयडीसीतील ११ एकर जागेवर आहे त्या स्थितीत वनराई फुलविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्याचबराबेर रस्ते, शाळा, बागांमध्ये झाडे लावण्यात येणार आहेत, अशी माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.