पंढरपूर तालुक्यात २७३ लोकांचे अहवाल निगेटिव्ह; १३१ लोक होते हाय रिस्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 07:45 AM2020-06-05T07:45:30+5:302020-06-05T07:48:44+5:30
ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्ण वाढले; २९ जणांचा अहवाल येणे बाकी
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यात ३०९ लोकांची कोरोनाबाबत चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी २७३ लोकांचा कोरोना चाचणीचा अहवाल गुरुवार पर्यंत निगेटिव्ह आला आहे. तर ७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गुरुवारी २० जणांचा निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे तर आणखी २९ जणांचा अहवाल येणे बाकी असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी सांगितले.
१ मे पासून पंढरपूर तालुक्यात ६ हजार ६५३ व्यक्ती बाहेरगावहून आले आहेत. यामध्ये ग्रामीण भागात ४८२५ तर शहरी भागात १८२८ लोक आले आहेत. यापैकी ५१९५ लोकांना घरात अलगीकरणचा करून ठेवण्यात आले होते. त्यापैकी १४ दिवस घरात अलगीकरणचा केलेल्या ३५२६ लोकांचा अलगीकरण कालावधी संपला आहे. तर १४२८ व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले होते. त्यापैकी १४ दिवस संस्थात्मक अलगीकरण केलेल्या ६२६ लोकांचा अलगीकरणचा कालावधी संपला आहे.
बाहेरुन आलेल्या ७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या ७ जणांच्या संपर्कात उपरीत ४७, गोपाळपूर ८०, करकंब ६०, बार्डी ८०, पंढरपूर ६९ असे एकूण ३३६ लोक आले होते. त्यापैकी १३१ लोक हाय रिस्क तर २०५ लोक लो रिस्क मध्ये आहेत. यापैकी संस्थात्मक अलगिकरण करण्यात आलेले ५७ लोक घरी सोडण्यात आले आहेत. त्याचबरोबर घरात अलगीकरण केलेले २०५ तर संस्थात्मक अलिकरण केलेल्या ७४ जणांवर प्रशासानाचे लक्ष केंद्रीत आहेत. त्याचबरोबर गुरुवारी २० जणांचा अहवाल निगेटीव्ह आला असल्याचे डॉ. एकनाथ बोधले यांनी सांगितले.
या गावात ऐवढे हाय रिस्क
- उपरी - २०
- गोपाळपूर - २३
- करकंब - ३०
- बार्डी - ३५
- पंढरपूर - २३
या गावात ऐवढे लो रिस्क
- उपरी - २७
- गोपाळपूर - ५७
- करकंब - ३०
- बार्डी - ४५
- पंढरपूर - ४६