करमाळा नगरपरिषदेच्या विकासकामासाठी नगरविकासमंत्र्याकडे निधीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:20 AM2021-01-18T04:20:55+5:302021-01-18T04:20:55+5:30
एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या विविध समस्या व मागणीसंदर्भात सोलापूर येथे जिल्हा नियोजन कार्यालयात बैठक घेतली. यावेळी करमाळ्याचे ...
एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या विविध समस्या व मागणीसंदर्भात सोलापूर येथे जिल्हा नियोजन कार्यालयात बैठक घेतली. यावेळी करमाळ्याचे आ. संजयमामा शिंदे व नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी करमाळा नगरपरिषदेच्या विविध विकासकामासाठी निधीची मागणी केली व प्रस्ताव सादर केला. यात करमाळा शहरातील नव्याने विकसित होणाऱ्या भागातील रस्ते, उर्वरित नाल्यासाठी ५ कोटी, प्रशासकीय इमारतीसाठी ५ कोटी, भुयारी गटारी योजनेसाठी ३३ कोटी, शहरातील व शहरालगतच्या हद्दीबाहेरील वसाहतीसाठी सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी २० कोटी व ऐतिहासिक सात नळविहीर परिसर सौंदर्यीकरण, हरितपट्टा विकास व सरोवर संवर्धन व वाॅकिंग ट्रेकसाठी २० कोटींची मागणी केली असून, तसा प्रस्ताव सादर केला आहे. लवकरच प्राधान्यक्रमाने करमाळा नगरपरिषदेला निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
यावेळी करमाळा नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण- २०२० अंतर्गत देशात २२ वा क्रमांक मिळविल्याबाबत ३ हजार ५०० झाडे लावून हरितपट्टा विकास केल्याबद्दल जिल्हाधिकारी मिलीिंद शंभरकर यांनी कौतुक केले.
----
फोटो ओळी : नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणीचे निवेदन देताना नगराध्यक्ष वैभवराजे जगताप.
----