जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली एक हजार डोसची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:17 AM2021-04-29T04:17:16+5:302021-04-29T04:17:16+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांना कोविशिल्ड लसीकरण मोहीम चालू आहे. सांगोला तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांना कोविशिल्ड लसीकरण मोहीम चालू आहे.
सांगोला तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सांगोला शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे नागरिकांना लसीकरण केले जात आहे. दरम्यान, सांगोला शहरात ४५ वर्षांपुढील ८,८६७ पैकी २४०० नागरिकांना म्हणजेच २६ टक्के लाभार्थ्यांना लसीकरण झाले आहे तर ६ हजार ४६७ नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यातून ४५ वर्षांपुढील नागरिकही ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी येत आहेत. लसीचा पुरवठा कमी आणि संख्या अधिक असल्याने लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.
१ मेपासून १८ वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण होणार आहे. सध्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना चालू असलेले लसीकरण याचा विचार करता जिल्हा शल्यचिकित्सलयाकडून सांगोला ग्रामीण रुग्णालय व तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरेसा लस पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
कोट ::::::::::::::::::::::
कोविशील्ड लस संपल्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सालयाकडे १००० डोसची मागणी केली आहे. येत्या दोन दिवसांत लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण मोहीम सुरळीत होईल. आत्तापर्यंत शहरातील ४५ च्या पुढील २४०० नागरिकांना लसीकरण केले आहे. यापुढे टोकन पद्धतीने व पोलीस बंदोबस्तात लसीकरण केले जाईल.
- डॉ. उत्तम फुले
प्रभारी वैद्यकीय अधिक्षक
फोटो ओळ ::::::::::::::::::
सांगोला ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रात कोविशिल्ड लस संपल्यामुळे बंद केल्याचे छायाचित्र.