धाराशिव येथे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या जनावरांची सुटका
By संताजी शिंदे | Published: March 7, 2023 06:58 PM2023-03-07T18:58:25+5:302023-03-07T18:59:07+5:30
धाराशिव येथे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या ६२ गोवंशांच्या जनावरांची, विश्वहिंदू परिषद बजरंग दलातील गोरक्षकांनी सुटका केली.
संताजी शिंदे सोलापूर: धाराशिव येथे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या ६२ गोवंशांच्या जनावरांची, विश्वहिंदू परिषद बजरंग दलातील गोरक्षकांनी सुटका केली. या बाबत जोडभावी पेठ पोलिस ठाणे व फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.
बेकायदा जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती विश्वहिंदू परिषद व बजरंग दलाच्या गोरक्षकांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून ५ मार्च २०२३ रोजी मार्केट यार्ड येथे पहाटे ३ वाजता सापळा रचण्यात आला होता. माहितीनुसार मार्केट यार्ड समोरील रस्त्यावरून पिकअप (क्र.एमएच १३ सीयू ६०९५) ही गाडी आली. गोरक्षकांनी गाडी (क्र.एमएच १३ सीयू ५९८६) आडवली व पहाणी केली असता त्यात दाटीवाटीने जनावरे भरण्यात आल्याचे निदर्शनास आले. गाडीवर जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गोहत्या प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. फौजदार चावडी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत पिकअप (क्र.एमएच १३ सीयू ६०९५) ही गाडी पकडण्यात आली. गाडीत जनावरे आढळून आले. वैराग येथेही अशाच पद्धतीने जनावरांची बेकायदा तस्करी करणाऱ्या पकडण्यात आले.
या प्रकरणी वैराग पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. तिन्ही गाडीतील जनावरे हे कत्तलीसाठी धाराशिव येथे घेऊन जात होते, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रशांत परदेशी यांनी दिली. कारवाईत जिल्हा उपाध्यक्ष योगीराज जडगोनार, शहराध्यक्ष अविनाश कैय्यावाले, सत्यवान ताटे, पवनकुमार कोमटी, अविनाश मदनावाले, पवन बल्ला, विनायक निकते, सूरज भोसले, ओम जगताप, विरेश मंचाल, प्रवीण यनगल, विवेक बडवे, व्यंकटेश बागल, पंपु पाटील, रोहित देशमुख, गणेश जाधव, सुरज माने आदींनी परिश्रम घेतले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"