५० फूट खोल विहिरीत पडलेल्या मोरास वाचवले; वन्यजीव प्रेमी, वनविभागाची कामगिरी!
By शीतलकुमार कांबळे | Updated: July 15, 2024 19:28 IST2024-07-15T19:25:27+5:302024-07-15T19:28:13+5:30
वनविभागाची कामगिरी; हंजगी गावातील घटना

५० फूट खोल विहिरीत पडलेल्या मोरास वाचवले; वन्यजीव प्रेमी, वनविभागाची कामगिरी!
सोलापूर: हंजगी (ता. अक्कलकोट) येथील एका विहिरीत पडलेल्या मोरास वाचवण्यात आले. ५० फूट खोल असलेल्या विहिरीत वन्यजीवप्रेमी उतरून सुरक्षितरीत्या मोरास बाहेर काढले. मागील दोन दिवसापासून मोर विहिरीतच पडला होता. हंगजी गावातील एका शेतकऱ्याला विहिरीत मोर पडलेला दिसला. याबाबत वनपाल शंकर कुताटे यांना माहिती देण्यात आली. त्यांनी वनरक्षक अनिता शिंदे व वनविभाग रेस्क्यू टीम ला कळविले. वनविभाग बवाच टीमचे सदस्य अनिता शिंदे, प्रविण जेऊरे, तेजस म्हेत्रे, वाहन चालक भीमराव राठोड घटनास्थळाकडे रवाना झाले.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी विहिरीचे निरीक्षण केले. मोर पडलेली विहीर ही ४० ते ५० फूट खोल होती. आत मध्ये प्रवेश करण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नव्हता. मोर विहिरीच्या आधी कोपऱ्यात घाबरून बसला होता. त्यामुळे आतमध्ये जाण्याच्या कोणताही पर्याय दिसत नव्हता, अशा वेळी प्रवीण जरूरे हे रॅपलिंग करत पन्नास फूट खोल विहीर उतरले. अत्यंत शीताफिने त्यांनी मोराला पिंजरामध्ये कैद केले. त्यानंतर सुरक्षितरित्या पिंजराला विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
गावातील पशुवैद्यकीय दवाखानामध्ये मोराची प्राथमिक तपासणी केली. त्या मोराला अशक्तपण असल्यामुळे टीटीसी सेंटर सोलापूरमध्ये आणण्यात आले. ही मोहीम सोलापूर वनविभाग सोलापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक खलाने, वनपाल शंकर कुताटे, वनरक्षक अनिता शिंदे, वाहन चालक भीमराव राठोड, वन्यजीव प्रेमी संस्था सदस्य तेजस म्हेत्रे या सदस्यांनी यशस्वी केली.