अमेरिकेसह १५ देशातील तज्ञ सादर करणार सोलापूर विद्यापीठात शोधनिबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 12:16 PM2018-12-04T12:16:41+5:302018-12-04T12:18:36+5:30
सोलापूर : महाराष्टÑात एकाच जिल्ह्यासाठी एकमेव असलेल्या सोलापूर विद्यापीठात येत्या २१ व २२ डिसेंबरला जागतिक परिषद होत आहे. यावेळी ...
सोलापूर : महाराष्टÑात एकाच जिल्ह्यासाठी एकमेव असलेल्या सोलापूरविद्यापीठात येत्या २१ व २२ डिसेंबरला जागतिक परिषद होत आहे. यावेळी अमेरिकेसह १५ देशांमधील तज्ज्ञ आपला शोधनिबंध सादर करणार आहेत.
सोलापूर विद्यापीठ, सोलापूर, साऊथा डाकोटा विद्यापीठ, अमेरिका आणि इवोरा विद्यापीठ, पोतुर्गाल यांच्या सहकार्याने ही परिषद होत आहे. ‘रिसेंट ट्रेंडस इन इमेज प्रोसेसिंग अँड पॅटर्न रिकग्नेशन’ या विषयावर या जागतिक परिषदेत चर्चा होणार आहे.
गेल्या वर्षभरापासून या परिषदेसाठी मागील संगणकशास्त्र संकुलातील प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थ्यांकडून तयारी सुरू आहे. या जागतिक परिषदेचे मुख्य समन्वयक म्हणून प्रा. डॉ. आर. एस. हेगडी हे काम पाहत आहेत. त्यांना पोतुर्गालच्या डॉ. तेरेसा जॉनकेलविस आणि अमेरिकेचे डॉ. के. सी. संतोष हे साहाय्य करीत आहेत.
या परिषदेत शोधनिबंध सादर करण्यासाठी विविध देशातून एकूण ३४० तज्ञांनी आपले शोधनिबंध पाठवले होते. त्यातील निवडक १८० शोधनिबंध या परिषदेत सादर होणार आहेत. यातील काही शोधनिबंध स्प्रिंजरसारख्या जागतिक पातळीवरील जर्नलमध्ये प्रकाशित केली जाणार आहेत. भारत, अमेरिका, बांगलादेश, श्रीलंका, युरोप, कोरिया, थायलंड, आयर्लंड अशा विविध १५ देशातील तज्ञांचा यामध्ये सहभाग असल्याचे डॉ. हेगडी यांनी सांगितले.