७५ पैकी ३२ ग्रामपंचायतींचे आरक्षण बदलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:34 AM2021-02-23T04:34:42+5:302021-02-23T04:34:42+5:30
२७ जानेवारी रोजी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले. त्यानंतर ९ व ११ फेब्रुवारीला सरपंच व उपसरपंच पदाची निवड होणार ...
२७ जानेवारी रोजी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले. त्यानंतर ९ व ११ फेब्रुवारीला सरपंच व उपसरपंच पदाची निवड होणार होती. मात्र तालुक्यातील कडलास, मानेगाव, अजनाळे व हटकर मंगेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमोर सुनावणी झाली. यामध्ये मेथवडे गावचे आरक्षण कायम ठेवून ७५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची नव्याने सोडत काढण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार २२ फेब्रुवारी रोजी तहसीलदार अभिजित पाटील, नायब तहसीलदार किशोर बडवे यांच्या उपस्थितीत नव्याने आरक्षण सोडत काढण्यात आली.
यामध्ये अनुसूचित जमाती : मेथवडे,
अनुसूचित जाती : यलमार-मंगेवाडी, संगेवाडी, हलदहिवडी, गायगव्हाण, कडलास, निजामपूर, आगलावेवाडी, अनुसूचित जाती महिला : वाणी चिंचाळे, खिलारवाडी, हणमंतगाव, तरंगेवाडी, राजापूर, बुरंगेवाडी, भोपसेवाडी, गळवेवाडी, ना.मा.प्र.महिला : पाचेगांव बु., वाढेगांव, वझरे, चोपडी-बंडगरवाडी, कोळा-कराडवाडी-कोंबडवाडी, सोनंद, नराळे-हबीसेवाडी, अनकढाळ, मांजरी-देवकतेवाडी, गौडवाडी, नाझरे-सरगरवाडी. ना.मा.प्र. : जुनोनी-काळूबाळूवाडी, धायटी, बलवडी, पारे, खवासपूर, वाकी (शिवणे) नरळेवाडी, चिणके, डिकसळ, लोटेवाडी, सोनलवाडी, सर्वसाधारण : महिम-कारंडेवाडी, कटफळ, इटकी, लक्ष्मीनगर, बागलवाडी, शिवणे, चिंचोली, शिरभावी-मेटकरवाडी, देवळे, सावे, जवळा, वाटंबरे, कमलापूर-गोडसेवाडी, लोणविरे, सोमेवाडी, किडेबिसरी, तिप्पेहाळी, जुजारपूर-गुणापवाडी, हंगिरगे-गावडेवाडी, हटकर मंगेवाडी, सर्वसाधारण महिला : महूद-ढाळेवाडी, अचकदाणी, एखतपूर, मेडशिंगी, वाकी-घेरडी, अकोला, अजनाळे-लिगाडेवाडी, मानेगाव, उदनवाडी-कारंडेवाडी-झापाचीवाडी, बुद्धेहाळ-करांडेवाडी, हातीद, डोंगरगाव, घेरडी, चिकमहूद-बंडगरवाडी, बामणी, आलेगांव, वासूद, राजुरी, पाचेगांव खुर्द अशा प्रकारे आरक्षण सोडत झाली आहे.
आरक्षण बदललेली गावे
नव्या आरक्षण सोडतीनंतर राजुरी, लक्ष्मीनगर, सोनलवाडी, लोटेवाडी, संगेवाडी, हलदहिवडी, चिकमहुद, गौडवाडी, नाझरे, मांजरी, वाढेगाव, खिलारवाडी, जुनोनी, मानेगाव, राजापूर, पाचेगाव खुर्द, हगिंरगे, आलेगाव, बुरंगेवाडी, हातीद, निजामपूर, आगलावेवाडी, महिम, वासुद, हणमंतगाव, गळवेवाडी, भोपसेवाडी, तरंगेवाडी, अचकदाणी, तिप्पेहाळी, चोपडी, हटकर मंगेवाडी या ३२ गावच्या सरपंच पदाच्या आरक्षणात बदल झाला आहे.