एक-दोन गावचे की तालुक्याचे आरक्षण बदलणार, सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्याची घालमेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:21 AM2021-02-12T04:21:17+5:302021-02-12T04:21:17+5:30
९ फेब्रुवारीपासून ९४ ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला होता़ त्या पार्श्वभूमीवर गावोगावी हालचाली गतिमान झाल्या होत्या. गावोगावचे ...
९ फेब्रुवारीपासून ९४ ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला होता़ त्या पार्श्वभूमीवर गावोगावी हालचाली गतिमान झाल्या होत्या. गावोगावचे इच्छूक उमेदवार आपलीच सरपंच किंवा उपसरपंचपदी वर्णी लागावी यासाठी प्रयत्न करीत होते. तसेच ग्रामपंचायत निवडी झाल्यानंतर आ़ राजेंद्र राऊत व माजी आ़ दिलीप सोपल या दोन प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी नेत्यांनी आमच्या ग्रामपंचायती जास्त संख्येने निवडून आल्याचे दावेप्रतिदावे केले होते़ त्यामुळे कोणत्या ग्रामपंचायतीवर कोणाचा सरपंच होणार हे स्पष्ट होणार होते. निवडणूकच स्थगित केली.
तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यात १६ ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या तर निवडणुका झालेल्या ७८ ग्रामपंचायतीमध्ये ५१ ग्रामपंचायती या माझ्या गटाच्या आल्याचा दावा आ़ राजेंद्र राऊत यांनी केला तर ३३ ग्रामपंचायतीवर आमच्या गटाचा झेंडा फडकल्याचे माजी आ़ दिलीप सोपल यांनी म्हटले होते़ तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या पांगरी ग्रामपंचायतीवर आ़ राजेंद्र राऊत गटाची सत्ता आली. त्यामुळे तिथे राऊत गटाचा सरपंच होणार हे नक्की.
उपळाईत अपक्ष सदस्याचा निर्णय महत्वाचा
पांगरीनंतर तालुक्यातील महत्वाच्या व मोठ्या ग्रामपंचायती असलेल्या उपळेदुमाला व उपळाई ठोंगे या दोन गावात कधी नव्हे अशी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे़ उपळाई ठोंगेमध्ये १३ सदस्यात आ़ राजेंद्र राऊत गटाचे सहा आणि दिलीप सोपल गटाचे सहा सदस्य निवडून आले आहेत़ एक अपक्ष सदस्य आहे़ एका सदस्यांने भलत्याच अपेक्षा व्यक्त केल्याने गावातील दोन्ही प्रमुख गट एकत्र येऊन दोघांनी सरपंचपद अडीच वर्षे घेऊन समझोता करीत एका सदस्याला बाजूला ठेवल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे प्रथम कोणत्या गटाचा सरपंच होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत़
त्रिशंकू असलेल्या उपळेदुमालेत काय होणार
उपळे दुमालामध्ये १३ सदस्या आहेत. त्यात आ़ राजेंद्र राऊत यांचे दोन गट असून यातील सचिन बुरगुटे यांचे तीन तर मनोज बुरगुटे यांचे सहा सदस्य निवडून आले आहेत़ बाजार समितीचे संचालक अनिल जाधव व यशवंत बुरगुटे यांचे चार सदस्य आल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे़ सरपंचद ओबीसी महिलेसाठी आरक्षित आहे़ त्यामुळे येथे काय होणार याकडे लक्ष लागले आहे.