सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 14:44 IST2019-11-19T14:39:37+5:302019-11-19T14:44:28+5:30

महिला किंवा पुरूष उमेदवारांना आता पदावर मिळणार संधी

Reservation for Solapur Zilla Parishad Presidency reserved for SC | सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी आरक्षित

सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी आरक्षित

ठळक मुद्दे- जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण मुंबईत झाले जाहीर- राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर- मुंबई येथील मंत्रालयातील एका कार्यालयात झाला हा कार्यक्रम

सोलापूर : येथील सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे़ मंगळवारी मुंबई येथे काढण्यात आलेल्या आरक्षण कार्यक्रमात सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपद हे अनुसूचित जाती गटातील महिला किंवा पुरूष उमेदवारांना आता या पदावर संधी मिळणार आहे.

सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली होती़ राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदासाठी मंगळवारी आरक्षण काढण्यात आले़ यावेळी सोलापूर अध्यक्षपद अनुसूचित जाती सर्वसाधारण साठी राखीव झाल्याने इच्छुकांच्या मनुष्यावर पाणी पडले आहे अनुसूचित जाती गटातील महिला किंवा पुरुष उमेदवारांना आता या पदावर संधी मिळणार आहे.

दरम्यान, भाजप आघाडीतर्फे साक्षी सोरटे (नातेपुते, माळशिरस), शीला शिवशरण (आवताडे गट, भालेवाडी, मंगळवेढा), राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अतुल खरात (भोसे, पंढरपूर), त्रिभुवन धाईंजे (वेळापूर, माळशिरस) आणि काँग्रेसतर्फे संजय गायकवाड (वळसंग, दक्षिण सोलापूर) यांना अध्यक्षपदाची संधी मिळू शकते.



 

Web Title: Reservation for Solapur Zilla Parishad Presidency reserved for SC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.