सोलापूरात निवासी डॉक्टर संपावर
By Admin | Published: March 20, 2017 05:09 PM2017-03-20T17:09:14+5:302017-03-20T17:09:14+5:30
सोलापूरात निवासी डॉक्टर संपावर
सोलापूरात निवासी डॉक्टर संपावर
सोलापूर : डॉक्टरांवर सातत्याने होणारे हल्ले व निवासी डॉक्टरांना होणा-या मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यासाठी सोलापूरातील निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला आहे़ या संपात शासकीय रूग्णालयातील १२८ डॉक्टर सहभागी झाले असल्याची माहिती डॉक्टर संघटनेचे डॉ़ पंकज नंदागवळी यांनी दिली़ कोणत्याही रूग्णांची गैरसोय होणार नाही याचीही काळजी घेण्यात येत असल्याची माहिती शासकीय रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ़ राजाराम पोवार यांनी दिली़ सोमवारी डॉक्टर संपावर गेल्याने शासकीय रूग्णालयात रूग्णांचे हाल झाले मात्र अत्यावश्यक सेवेमुळे रूग्णांना दिलासा मिळाला़
राज्यातील निवासी डॉक्टरांना होणा-या मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. सायन रुग्णालयात शनिवारी रात्री सुरक्षारक्षकांसमोर रुग्णांच्या नातेवाईकांनी निवासी डॉक्टर रोहित कुमार यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणाचा विरोध दर्शवण्यासाठी मुंबईसह राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी बेमुदत बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेत वाढ करावी, डॉक्टर प्रोटेक्शन कायदा कडक करावा, डॉक्टरांवर होणारे हल्ल्यांचे दाखल झालेले केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावेत, राज्यात आतापर्यंत ४५ केसेस दाखल झाले आहेत मात्र तपास रखडला आहे़ तो त्वरीत करून संबंधितांवर कारवाई व्हावी यासह आदी मागण्यांबाबत निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे़