मराठा आरक्षणासाठी महिला सरपंच, दोन उपसरपंचासह ११ सदस्यांचे राजीनामे

By दिपक दुपारगुडे | Published: October 30, 2023 05:29 PM2023-10-30T17:29:59+5:302023-10-30T17:30:16+5:30

रांझणी भीमानगरच्या सरपंच चंचला विजय पाटील यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला

Resignation of 11 members including women sarpanch, two deputy sarpanches for Maratha reservation In Solapur | मराठा आरक्षणासाठी महिला सरपंच, दोन उपसरपंचासह ११ सदस्यांचे राजीनामे

मराठा आरक्षणासाठी महिला सरपंच, दोन उपसरपंचासह ११ सदस्यांचे राजीनामे

सोलापूर : मराठा समाजास आरक्षण मिळावे, या मागणीसाठी रांझणी भीमानगर (ता. माढा) येथील सरपंच, तसेच सुर्डी (ता. बार्शी) येथील उपसरपंचांसह चार सदस्यांनी राजीनामे दिले.

रांझणी भीमानगरच्या सरपंच चंचला विजय पाटील यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला. नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील सात सदस्य यासह उपसरपंचानी राजीनामा दिला आहे. तर  सुर्डी (ता. बार्शी) येथील उपसरपंच अण्णासाहेब मोहन शेळके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्या जया मधुकर शेळके, अनिल भीमराव डोईफोडे, मंजुश्री चक्रधर शेळके यांनी ग्रामपंचायत सदस्यत्वाचे राजीनामे दिले.

माढा तालुक्यातील रांझणी-भीमानगर येथे मनोज जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषण आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. सुर्डी ग्रामपंचायत कार्यालयातील राजकीय नेत्यांचे फोटो काढण्यात आले. त्याचबरोबर सुर्डी गावात राजकीय नेते, आमदार, खासदार यांना गावबंदी करण्यात आली आहे.

Web Title: Resignation of 11 members including women sarpanch, two deputy sarpanches for Maratha reservation In Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.