आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा राजीनामा घ्या, सोलापुरात ठाकरे गटाची निदर्शने
By राकेश कदम | Published: October 6, 2023 03:42 PM2023-10-06T15:42:47+5:302023-10-06T15:42:53+5:30
डॉक्टर आणि नर्स यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले. या प्रकाराला आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे जबाबदार आहेत. त्यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी असेही बरडे म्हणाले.
सोलापूर : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे दुर्लक्ष आणि आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे ठाणे आणि नांदेड येथील शासकीय रुग्णालयात ९० रुग्णांचा मृत्यू झाला. या प्रकरणात नैतिकता म्हणून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा. अन्यथा सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहर प्रमुख विष्णू कारमपुरी यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
पुरुषोत्तम बरडे म्हणाले, नांदेड, ठाणे इतर शासकीय रुग्णालयात डॉक्टर, नर्सेसची संख्या कमी आहे. औषधाचा कमी प्रमाणात पुरवठा झाला. आरोग्य मंत्री व खोके सरकारचा शासकीय रुग्णालयाकडे अद्याप दुर्लक्षपणा यामुळे रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाचा गैरवापर करून संपूर्ण महाराष्ट्रात बोगस महाआरोग्य शिबिरे राबविण्यात आली. दुसरीकडे डॉक्टर आणि नर्स यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले. या प्रकाराला आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे जबाबदार आहेत. त्यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी असेही बरडे म्हणाले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, युवती सेनेच्या रेखा आडकी, विठ्ठल कुऱ्हाडकर, सुरेश शिंदे, संभाजी कोडगे, गुरुनाथ कोळी, गोवर्धन मुदगल, अक्षय चिलबेरी, श्रीनिवास बोगा, जर्गीस मुल्ला, शुभम कारमपुरी, अक्षय नंदाल, अजय कारमपुरी, नागमणी भंडारी, स्वाती शिंदे आदी उपस्थित होते.