मोहोळ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक प्रल्हाद गायकवाड यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 01:28 PM2020-04-17T13:28:53+5:302020-04-17T13:38:50+5:30
सोलापूर जिल्हा प्रशासनाचे सहकार्य मिळत नसल्याची केली तक्रार
मोहोळ : मोहोळ तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जरी प्रशासन उत्तम जबाबदारी पार पाडत असले तरी कोरोना सारख्या संसर्गजन्य पारिस्थितीत काम करताना तालुका प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करीत मोहोळच्या ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक डॉ. पी. पी गायकवाड यांनी नोकरीचाच राजीनामा वरिष्ठाकडे पाठवल्याने खळवळ उडाली आहे.
मोहोळ तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये समन्वय राखण्याची गरज आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये कोरोना सदृश्य रुग्णांसाठी आवश्यक असणारे रुग्णवाहिका मिळावी यासाठी डॉ. प्रल्हाद गायकवाड हे वेळोवेळी मागणी करत होते. तसेच नजीक पिंपरी येथील कोरोन्टाईन सेंटरमध्ये ठेवलेले अनेक नागरिक निघून चालले आहेत, त्यामुळे येथे पी.एस.सी चे कर्मचारी नेमावेत या मागणीसाठी मोहोळ तालुका प्रशासनाकडून कोणतेच सहकार्य लाभले नसल्याने मला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे माझ्या खुशीने राजीनामा देत असल्याचे डॉक्टर प्रल्हाद गायकवाड यांनी लिहून राजीनामा वरिष्ठाकडे सादर केला. या घटनेमुळे प्रशासनामधील कारभार बाहेर आला असून या राजीनाम्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
सध्या कारोना सारख्या संसर्गजन्य आजाराने जगभर थैमान घातले असतानाही मोहोळच्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरासह सर्वच कर्मचारी इमानेइतबारे काम करत आहेत. अशा परिस्थितित सोलापूर जिल्हात अचानकपणे रूग्णांच्या संख्येत भर पडली आहे . अशा वेळी ग्रामीण रूग्णालयाची यंत्रणा सज्ज असणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीतही तालुका प्रशासनाकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने काम करण्याची इच्छा असतानाही राजीनामा द्यावा लागला आहे.