पुणे विभागात पंचवीस हजार झाडे लावण्याचा संकल्प

By काशिनाथ वाघमारे | Published: August 20, 2023 07:39 PM2023-08-20T19:39:01+5:302023-08-20T19:39:23+5:30

स्वामी समर्थांच्या नगरीतून वृक्षारोपणाचा शुभारंभ, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यात २५ हजार वृक्ष लावण्याचा संकल्प पीडब्ल्यूडी विभागाने केला आहे.

Resolution to plant twenty five thousand trees in Pune Division | पुणे विभागात पंचवीस हजार झाडे लावण्याचा संकल्प

पुणे विभागात पंचवीस हजार झाडे लावण्याचा संकल्प

googlenewsNext

सोलापूर  : सार्वजनिक बांधकाम विभागाने पुणे विभागातील महामार्गाच्या दोन्ही बाजूंना २५ हजार झाडं लावण्याचा संकल्प सोडला आहे. या अभियानाचा शुभारंभ स्वामी समर्थांच्या अक्कलकोटनगरीतून झाला आहे. पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ झाला.

पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यात २५ हजार वृक्ष लावण्याचा संकल्प पीडब्ल्यूडी विभागाने केला आहे. हायवेच्या दोन्ही बाजूंना ५ ते ६ फूट उंचीचे २५ हजार देशी झाडांची लागवड करून संगोपनाचा वसा पीडब्ल्यूडी विभागाने घेतला आहे. यापैकी अक्कलकोटमध्ये ५०० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. अक्कलकोट ते दोड्याळ हायवे क्रमांक २११ या ठिकाणी वृक्षारोपण झाले. 

यावेळी अधीक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता गावडे, उपविभागीय अभियंता अमोल खमीतकर, गटविकास अधिकारी सचिन खुड्डे, शाखा अभियंता तेली, ढाळे, वरिष्ठ लिपिक विकास हरवाळकर उपस्थित होते.

Web Title: Resolution to plant twenty five thousand trees in Pune Division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.