डॉक्टरांच्या बदल्यांना वडाळा ग्रामपंचायतीचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:24 AM2021-09-21T04:24:07+5:302021-09-21T04:24:07+5:30
भला मोठा सरकारी दवाखाना व डाॅक्टरही पुरेसे; मात्र उपचार खासगी दवाखान्यात करावे लागत असल्याबद्दल प्रकाश टाकला होता. डाॅक्टरांची सेवा ...
भला मोठा सरकारी दवाखाना व डाॅक्टरही पुरेसे; मात्र उपचार खासगी दवाखान्यात करावे लागत असल्याबद्दल प्रकाश टाकला होता. डाॅक्टरांची सेवा मिळत नसल्याने वडाळा ग्रामपंचायतीने ठरावात प्रभारी अधीक्षक अविनाश घोरपडे, डाॅ. विकास माने, डाॅ. माया शेळके यांच्या बदल्या करण्यात याव्यात, असे म्हटले आहे.
जून महिन्यात ग्रामपंचायतीने दोन डाॅक्टरांच्या बदल्यांचा उल्लेख ठरावात केला होता. आता लोकमतच्या वृत्तानंतर नव्याने अधीक्षकांसह तिन्ही डाॅक्टरांना बदला, असे ठरावात म्हटले आहे. ठरावाच्या प्रति आरोग्य मंत्री, आरोग्य संचालक, उपसंचालक व सिव्हिल सर्जन यांना दिल्या आहेत.
----
.. तर दवाखान्यालाच कुलूप लावू: काका साठे
आरोग्य केंद्र असताना एका दिवसात ३५० पर्यंत रुग्ण तपासणी व्हायची. डाॅक्टर उशिरापर्यंत सेवा द्यायचे. आता ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवा मिळत नाही. सांगून- सांगून वैताग आला आहे. डाॅक्टरांच्या बदल्या केल्या नाहीत तर दवाखान्याला कुलूप लावतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांनी सांगितले.