आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या आंदोलकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:16 AM2021-06-26T04:16:44+5:302021-06-26T04:16:44+5:30
आणीबाणीत तुरुंगवास भोगलेले स्व. ॲड. पांडुरंग खर्डीकर यांचे चिरंजीव ॲड. नागेश खर्डीकर, अजय देशपांडे यांचे बंधू विठ्ठल देशपांडे, स्व. ...
आणीबाणीत तुरुंगवास भोगलेले स्व. ॲड. पांडुरंग खर्डीकर यांचे चिरंजीव ॲड. नागेश खर्डीकर, अजय देशपांडे यांचे बंधू विठ्ठल देशपांडे, स्व. वसंतराव पुजारी यांचे नातू हृषिकेश पुजारी यांचा सत्कार केला. यावेळी झेडपी सदस्य अतुल पवार, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आलदर, शहराध्यक्ष आनंद फाटे, डॉ. विजय बाबर, नागेश जोशी, शिवाजी आलदर, मानस कमलापूरकर, विजय ननवरे, नंदू येलपले, दुर्वा हिप्परकर, राहुल होनमाने, प्रसाद फुले, अनिल वाघमोडे, प्रवीण जानकर, दीपक केदार, विनोद उबाळे, बाळासाहेब चव्हाण आदी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
कोट ::::::::::::
२५ जून १९७७ हा लोकशाहीतील आणीबाणीचा काळ हा खूप भयानक काळ होता. संघाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना विना चौकशी तुरुंगात डांबण्यात आले. आमचे वडील स्व. पांडुरंग खर्डीकर यांना नाशिकच्या जेलमध्ये ठेवले होते. दरम्यान, आणीबाणी उठविण्यासाठी चुन्याने भिंती रंगवल्याप्रकरणी अजय देशपांडे, श्रीराम पुजारी, दिलीप ठोंबरे यांना अटक झाली, तर मी तीन महिने भूमिगत होतो.
- ॲड. नागेश खर्डीकर
सांगोला