बोरोटीत आरोग्य शिबिराला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:23 AM2021-04-04T04:23:10+5:302021-04-04T04:23:10+5:30
उडगी : अक्कलकोट तालुक्यात बोरोटी येथे मानव सेवा फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला प्रतिसाद मिळाला. बोरोटी बुद्रुक आणि ...
उडगी : अक्कलकोट तालुक्यात बोरोटी येथे मानव सेवा फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला प्रतिसाद मिळाला. बोरोटी बुद्रुक आणि बोरोटी खुर्द या दोन गावांतील लोकसंख्या मोठी आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अक्कलकोट बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय होत असल्याने गावातील वयोवृद्ध व प्रसूती महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी मानव सेवा फाउंडेशनच्या व संजीवनी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी संजीवनी ब्लड बँकेचे चेअरमन गुरू पाटील व डॉ. पिंटू पाटील, प्रसूती तज्ज्ञ डॉ. भाग्यश्री मद्री-बनसोडे, डॉ. रवींद्र बनसोड़े यांनी मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना औषधे दिली.
यावेळी बोरोटीचे सरपंच अशोक ढंगापुरे, आरपीआयचे तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, महादेव कांबळे, आशा, सावित्री पुजारी, अमोल पुटगे, कोतवाल सैपन पठाण, हनुमंत कांबळे, अर्जुन सुताऱ, सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता कांबळे उपस्थित होते.
---
०३ बोरोटी
बोरोटी येथे आरोग्य शिबिराप्रसंगी गुरू पाटील, डॉ. पिंटू पाटील, प्रसूती तज्ज्ञ डॉ. भाग्यश्री मद्री-बनसोडे, डॉ. रवींद्र बनसोडे.