संगोगीत शेतकरी मेळाव्याला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:17 AM2020-12-09T04:17:21+5:302020-12-09T04:17:21+5:30
अक्कलकोट : संगोगी (ब) येथे कृषी विभागामार्फत जागतिक मृदा दिनानिमित्त शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी व्यासपीठावर तालुका कृषी अधिकारी ...
अक्कलकोट : संगोगी (ब) येथे कृषी विभागामार्फत जागतिक मृदा दिनानिमित्त शेतकरी मेळावा पार पडला.
यावेळी व्यासपीठावर तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर, कृषी परिवेक्षक राजकुमार नजूंडे, कृषी सहायक महेश बंदिछोडे, योगेश कटारे, पोलीसपाटील मीनाक्षी चौधरी उपस्थित होते. विभागीय कोरडवाहू कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. देवेंद्र इंडी यांनी मार्गदर्शन केले.
पीक उत्पादन घेण्यापूर्वी नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म मूलद्रव्यांचे महत्त्व त्यांनी सांगितले. जमिनीची सुपिकता टिकविण्यासाठी कचरा जमिनीत गाढण्याचे आवाहन केले. प्रास्ताविकेत सूर्यकांत वडखेलकर जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी माती परीक्षण करून घेण्याचे आवाहन केले. चिक्केहळळी, हालचिंचोळी, हंद्राळ, कलहिप्परगे, गोगाव, सांगवी खु., तोरणी या गावात जनजागृती कार्यक्रम तालुका कृषी कार्यालयाकडून करण्यात आली.
सूत्रसंचालन कृषी सहायक महेश बंदीछोडे यांनी केले, तर आभार योगेश कटारे यांनी मानले.
---
फोटो : ०८ अक्कलकाेट कृषी
संगोगी (ब) येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शास्त्रज्ञ डॉ. देवेंद्र इंडी, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर.