मंगळवेढ्यातील सिद्धनाथ ज्वेलर्सच्या धमाका ऑफरला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:26 AM2021-08-22T04:26:34+5:302021-08-22T04:26:34+5:30

मंगळवेढा : मंगळवेढा शहरातील नामांकित सिद्धनाथ ज्वेलर्सच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ग्राहकांसाठी सोने-चांदी खरेदीवर सुरू केलेल्या धमाका ऑफर योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद ...

Response to Siddhanath Jewelers' Blast Offer on Mars | मंगळवेढ्यातील सिद्धनाथ ज्वेलर्सच्या धमाका ऑफरला प्रतिसाद

मंगळवेढ्यातील सिद्धनाथ ज्वेलर्सच्या धमाका ऑफरला प्रतिसाद

Next

मंगळवेढा : मंगळवेढा शहरातील नामांकित सिद्धनाथ ज्वेलर्सच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ग्राहकांसाठी सोने-चांदी खरेदीवर सुरू केलेल्या धमाका ऑफर योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शुद्धता, सचोटी व विश्वास या त्रिसूत्रीच्या भक्कम पायावर गेल्या २५ वर्षांपासून उभ्या राहिलेल्या रावसाहेब चव्हाण-पाटील आटपाडीकर यांच्या सिद्धनाथ ज्वेलर्सने हॉलमार्क दागिने देणारे दुकान म्हणून नावलौकिक मिळविला आहे. सिद्धनाथ ज्वेलर्स या आलिशान सोन्या-चांदीच्या दालनात आजच्या युगात महिलांच्या सौंदर्यात भर घालतील, असे हलके फुलके दागिने, फॅन्सी दागिने, चपलाहार, बांगड्या, पाटल्या, लक्ष्मी शिक्के, चोकर, अँटिक ज्वेलरी, टेम्पल ज्वेलरी, गंठण, दंडपोची, ठुसी, एअररिंग, अंगठी, राणीहार, पोहेहार, तसेच शिवकालीन दागिने असे मनात बसतील असे मनमोहक सोन्याचे दागिने उपलब्ध आहेत. रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सुरू केलेल्या धमाका ऑफर योजनेत पहिले बक्षीस बुलेट गाडी, द्वितीय बक्षीस ॲक्टिव्हा गाडी, तृतीय बक्षीस एसी यासह स्मार्ट टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाइल, ओहन, पैठणी, कूलर, मिक्सर, डिनर सेट, फॅन, गॅस शेगडी, शिलाई मशीन आदी २५ आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. १० हजार रुपये सोने व पाच हजार रुपयांच्या चांदी खरेदीवर कुपन मिळणार आहे. यासाठी कालावधी ३१ ऑगस्टपर्यंत ठेवण्यात आला आहे. ग्राहकांच्या वाढत्या मागणीनुसार सात व बारा महिन्यांसाठी सुवर्ण संचय योजनाही सुरू करण्यात आली आहे. (वा. प्र.)

---

फोटो : २१ मंगळवेढा

सिद्धनाथ ज्वेलर्समध्ये धमाका ऑफर योजनेस ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Response to Siddhanath Jewelers' Blast Offer on Mars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.