बार्शीत विविध स्पर्धांना प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:22 AM2021-02-10T04:22:01+5:302021-02-10T04:22:01+5:30

बार्शी : बारंगुळे प्लॉट येथे आयोजित केलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते पारितोषीक वितरण करण्यात ...

Response to various competitions in Barshi | बार्शीत विविध स्पर्धांना प्रतिसाद

बार्शीत विविध स्पर्धांना प्रतिसाद

Next

बार्शी : बारंगुळे प्लॉट येथे आयोजित केलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते पारितोषीक वितरण करण्यात आले.

महेदीमियॉं लांडगे व बारंगुळे प्लॉट मित्रमंडळाच्यावतीने या खुल्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश काटकर, बालाजी डोईफोडे, संतोष कळमकर, सुहास कांबळे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, माजी नगरसेवक महेदीमियॉं लांडगे, सामाजिक कार्यकर्ते वैभव पाटील, कॉंग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा ऍड. सुप्रिया गुंड-पाटील, भाजपच्या पद्मजा काळे, हाजी सौदागर, नितीन सोडळ, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष वसीम पठाण, आतिष बिसेन, अजित कांबळे, जुबेर बागवान, बंडू माने उपस्थित होते. लिंबू चमचा स्पर्धेत प्रथम क्रमांक ओम जानराव, व्दितीय गौसीया लांडगे, तृतीय आदित्य चौधरी-महेक मुल्ला यांना तर स्लो सायकल स्पर्धेत प्रथम रोहित गरड, व्दितीय प्रणव काटकर, तृतीय हुजेब बागवान, संगीत खुर्ची मध्ये प्रथम सुप्रिया गवळी, व्दितीय हाजराबी उस्ताद, तृतीय ऐश्वर्या शिंदे, चतुर्थ प्राजक्ता कांबळे, उत्तेजनार्थ मंदाकिनी पवार यांनी पटकावला. कृष्णराज बारबोले, वसीम पठाण, अमृत शाळू, डॉ. अंगारशा, ऍड. नितीन सोडळ, आतिश बिसेन, सुजाता उपरे, आप्पा उदाने, शौर्य पाटील, शाहिद शेख यांच्या वतीने ही पारितोषीके देण्यात आली. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी राजन मोमीन, बाबा शेख, शाहीद शेख, इरफान लांडगे, शहेनाज शेख, मुश्ताक जलसे, मंजूर मंद्रुपकर, विकी शिंदे, रफिक पठाण, सुशांत गायकवाड, इक्बाल शेख यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Response to various competitions in Barshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.