सोलापूर शहर अन् जिल्ह्यात १५ जूनपर्यंत निर्बंध कडक; जाणून घ्या...काय चालू अन् काय बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 07:47 AM2021-06-01T07:47:08+5:302021-06-01T07:50:45+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Restrictions tightened till June 15 in Solapur city and district; Find out ... what's going on and what's going on | सोलापूर शहर अन् जिल्ह्यात १५ जूनपर्यंत निर्बंध कडक; जाणून घ्या...काय चालू अन् काय बंद राहणार

सोलापूर शहर अन् जिल्ह्यात १५ जूनपर्यंत निर्बंध कडक; जाणून घ्या...काय चालू अन् काय बंद राहणार

googlenewsNext

सोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला, परंतु ग्रामीण भागातील रुग्णसंख्या अजूनही कमी झाली नसून मृत्यूदरही चिंताजनक आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागात अत्यावश्‍यक सेवा वगळून अन्य कोणत्याही दुकानांना परवानगी न देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी घेतला. तर तोच निर्णय महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी शहरासाठी लागू केला आहे.

शहरालगत असलेल्या दक्षिण व उत्तर सोलापूर, अक्‍कलकोट, मोहोळ या तालुक्‍यांचा मृत्यूदर सर्वाधिक असून पंढरपूर, बार्शी, माळशिरस, माढा, करमाळा या तालुक्‍यात रुग्णवाढ मोठी आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पूर्वीप्रमाणेच निर्बंध असावेत आणि शहरासाठीही तोच निर्णय असावा, असा निर्णय ठरला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री साडेदहा वाजता त्या संदर्भात आदेश काढला. 

आदेशानुसार कोणती दुकाने सुरू राहणार...

  • किराणा दुकाने, भाजीपाला, डेअरी, बेकरीसह अन्य खाद्यपदार्थांच्या दुकानांना सकाळी सात ते अकरापर्यंतच परवानगी

  • रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना पार्सल व घरपोच सेवेसाठी सकाळी सात ते रात्री आठपर्यंत दिली मुभा

  • हॉटेल, बार, रेस्टॉरंट राहणार बंदच, पण होम डिलिव्हरी व पार्सल सेवेला परवानगी

  • सार्वजनिक वाहतूक, टॅक्‍सी, बससेवा सुरू होईल; पण प्रवाशांची मर्यादा पूर्वीप्रमाणेच पाळावी लागणार

  • विवाहासाठी 25 व्यक्‍तींची मर्यादा; विवाह समारंभातील कर्मचाऱ्यांकडे कोरोना चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक

  • परीक्षांना सवलती, 12 वी परीक्षेसाठी सवलत मात्र परीक्षेसंबंधित सर्वांना कोरोनाची चाचणी करण्याची अट

काय बंद राहणार...

  • शहर-जिल्ह्यातील सलून दुकाने उघडण्यास परवानगी नाहीच

  • मंदिरे, धार्मिक स्थळांना परवानगी नाहीच; नियम पाळून नित्यपूजा करता येईल

  • सिनेमागृहे, नाट्यगृहे व मनोरंजनाची कोणतीही सेवा सुरू राहणार नाही

  • अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने वगळता अन्य कोणत्याही दुकानांना परवानगी नाही

  • आदेशातून शेतकऱ्यांना दिलासा

Web Title: Restrictions tightened till June 15 in Solapur city and district; Find out ... what's going on and what's going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.