राज्य सहकारी बँकेमधील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधिशांची नेमणूक करणार : सहकारमंत्री

By admin | Published: March 31, 2017 04:25 PM2017-03-31T16:25:34+5:302017-03-31T17:09:07+5:30

.

Retiring officers will be appointed for inquiry into mismanagement of state co-operative bank: Cooperative Minister | राज्य सहकारी बँकेमधील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधिशांची नेमणूक करणार : सहकारमंत्री

राज्य सहकारी बँकेमधील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधिशांची नेमणूक करणार : सहकारमंत्री

Next


सोलापूर दि ३१ : राज्य सहकारी बँकेमधील गैरव्यवहारांच्या जवळपास २ हजार प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे़ ती चौकशी वेळेत व्हावी यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करण्यात येईल, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी विधानसभेत प्रश्नोतराच्या तासात सांगितले.
या संदर्भात विधानसभा सदस्य जयप्रकाश मुंदडा यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना श्री.देशमुख बोलत होते.
सहकारमंत्री देशमुख म्हणाले की, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांनी चौकशी पूर्ण करण्यासाठी २२ नोव्हेंबर २०१६ पर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतू या प्रकरणात न्यायालयाची स्थगिती असल्यामूळे चौकशी वेळेत पूर्ण होण्यास विलंब झाला आणि २२ नोव्हेंबर २०१६ पासून पुन्हा पुढे एक वषार्ची मुदतवाढ देण्यात यावी अशी चौकशी अधिकाऱ्यांनी विनंती केली. परंतू या चौकशीला अजून मुदतवाढ देण्यात आली नाही. ही चौकशी वेळेत पूर्ण व्हावी यासाठी निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करुन वेळेत पूर्ण करण्यात येईल. या प्रकरणात जवळपास दोन हजार गैरव्यवहार प्रकरणांचा समावेश आहे. या गैरव्यवहारात असणाऱ्यांना व्यक्तींना कुठल्याही प्रकारचे सरंक्षण दिले जाणार नाही, असेही देशमुख यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अतुल भातखळकर, सुरेश हळवणकर, प्रकाश अबिटकर, अमर काळे, आशिष शेलार, चैनसुख संचेती यांनी सहभाग घेतला.

Web Title: Retiring officers will be appointed for inquiry into mismanagement of state co-operative bank: Cooperative Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.