पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:20 AM2021-07-25T04:20:47+5:302021-07-25T04:20:47+5:30
आषाढी वारीतील गोपाळकाल्यासाठी गोपाळपूर येथे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम या जयघोषात सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या. मानाच्या पालख्यांनी ...
आषाढी वारीतील गोपाळकाल्यासाठी गोपाळपूर येथे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम या जयघोषात सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या. मानाच्या पालख्यांनी गोपाळकाला गोड केल्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदिरात आल्या. सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि परतीचा प्रवास सुरु केला.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, ॲड. माधवी निगडे, शंकुतला नडगिरे यांनी पालखी सोहळा प्रमुख, मानकरी यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर संताच्या पालख्या आपापल्या मठात गेले. त्यानंतर आपापल्या गावांकडे प्रस्थान करण्याच्या वेळी शहरातील नागरिकांनी पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. वारीच्या सोहळ्यात विठ्ठल दर्शनाची आस पूर्ण झाल्यानंतर जातो माघारी पंढरी नाथा । तुझे दर्शन झाले आता ॥ यानुसार सर्व पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला.
-----