तेलगावच्या सरपंचपदी रेवणसिद्ध पुजारी बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:23 AM2021-02-11T04:23:50+5:302021-02-11T04:23:50+5:30
तालुक्यातील तेलगाव (सीना) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी सरपंच मोहन लांबतुरे यांच्या गटाचे तीन तर रेवणसिद्ध पुजारी व झेंडे यांचे ...
तालुक्यातील तेलगाव (सीना) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी सरपंच मोहन लांबतुरे यांच्या गटाचे तीन तर रेवणसिद्ध पुजारी व झेंडे यांचे चार सदस्य विजयी झाले होते. सरपंचपद हे इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने कावेरी गडदे याही इच्छुक होत्या. सरपंचपदासाठी पुजारी व गडदे यांच्यात वाद झाला. त्यामुळे पुजारी यांनी विरोधी लांबतुरे यांचा पाठिंबा घेण्याचा निर्णय घेतला. नंतर पुजारी यांना सरपंच व काजल बनसोडे यांना उपसरपंच करण्याचा निर्णय घेतला.
त्याप्रमाणे मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी भोसले यांच्याकडे सरपंच पदासाठी पुजारी व उपसरपंचपदासाठी बनसोडे यांनी अर्ज दाखल केले. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आले, मात्र निवडीवेळी ७ पैकी तिघेच उपस्थित होते. कोरम पूर्ण होण्यासाठी किमान चार सदस्य उपस्थित राहिले पाहिजेत. कोरम पूर्ण झाला नसल्याने निवड स्थगित केली. स्थगित झालेली सभा बुधवारी घेण्यात आली. आजही तीनच सदस्य उपस्थित होते, आज कोरमची आवश्यकता नसल्याने पुजारी व बनसोडे यांची सरपंच, उपसरपंचपदी निवड करण्यात आली.