सूडबुद्धीनेच माळशिरस तालुक्याचा विकास रोखून धरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:15 AM2021-06-27T04:15:44+5:302021-06-27T04:15:44+5:30
भाजपाने राज्यभर राबवलेल्या चक्काजाम आंदोलनाला अकलूज येथे मोठा प्रतिसाद मिळाला. आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. राम सातपुते, भाजपा जिल्हा संघटक ...
भाजपाने राज्यभर राबवलेल्या चक्काजाम आंदोलनाला अकलूज येथे मोठा प्रतिसाद मिळाला. आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. राम सातपुते, भाजपा जिल्हा संघटक सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली अकलूजमधील गांधी चौकात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी जि.प. सदस्य अरुण तोडकर, सुनंदा फुले, प्रताप पाटील, चंद्रकांत काकुळे, संदिप घाडगे, फातिमा पाटावाला, हनुमंत सरगर, बाजीराव काटकर, संदीप घाडगे, अनिसा तांबोळी, शशिकला भरते, शंकरराव काकुळे, अरविंद राऊत, संजय गोरवे, तुकाराम साळुंखे, कल्पना कुलकर्णी, मुक्तार कोरबू यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण रद्द झाले असून सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन केले आहे. राज्याचे संयमी नेतृत्व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शिकवणीमुळे शांततेत व संयमाने आंदोलन पार पडले. राज्य शासनाने ओबीसी आरक्षणाचा बळी देऊन ओबीसी समाजाला अंधकारात ढकलले आहे. परंतु भाजपा ओबीसींच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून आरक्षण मिळेपर्यंत सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलने केली जातील, असा इशारा आमदार राम सातपुते यांनी दिला. आंदोलनानंतर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना निवेदन देण्यात आले.