महसूल कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन, वित्त विभागाकडून १७ कोटी निधी जमा
By बाळकृष्ण दोड्डी | Published: September 15, 2023 12:31 PM2023-09-15T12:31:59+5:302023-09-15T12:32:08+5:30
जुलै आणि ऑगस्ट मध्ये वेतन न मिळाल्याने सोलापुरातील चौदाशेहून अधिक महसूल कर्मचारी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता.
सोलापूर : थकीत दोन महिन्यांच्या वेतनासाठी वित्त विभागाने सतरा कोटी निधी जिल्हा प्रशासनाकडे जमा केला आहे. त्यामुळे वेतनासाठी लेखणी बंद आंदोलनाचा दिलेला इशारा मागे घेतल्याची माहिती महसूल कर्मचारी संघटनेचे शंतनू गायकवाड यांनी दिली.
जुलै आणि ऑगस्ट मध्ये वेतन न मिळाल्याने सोलापुरातील चौदाशेहून अधिक महसूल कर्मचारी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. वेतन निधीसाठी कर्मचाऱ्यांनी शुक्रवार पर्यंत अल्टिमेटम दिला होता. अखेर, गुरुवारी १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी प्रशासनाकडे १७ कोटी वेतन निधी जमा झाल्याची माहिती आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पाठपुराव्यामुळे वेतन निधी जमा झाल्याची माहिती महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंतनू गायकवाड यांनी दिली. पुढील दोन दिवसात कर्मचाऱ्यांच्या खात्यावर थकीत वेतन जमा होईल, असेही गायकवाड यांनी सांगितले.