आषाढीच्या आयआरएस प्रणालीत राबणार महसूल यंत्रणा
By admin | Published: July 1, 2016 05:59 PM2016-07-01T17:59:24+5:302016-07-02T12:43:51+5:30
'यंदाची आषाढी वारी, निर्मल वारी' या संकल्पनेद्वारे आषाढी वारीचे नियोजन करण्यात आहेत. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्यास इतर संतांच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यात
Next
>६५ एकरातील सुविधांमध्ये वाढ - जिल्हाधिकारी रणजीत कुमार
सोलापूर - 'यंदाची आषाढी वारी, निर्मल वारी' या संकल्पनेद्वारे आषाढी वारीचे नियोजन करण्यात आहेत. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्यास इतर संतांच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यात आल्यापासून परत जाईपर्यंत सोईसुविधा देण्यासाठी यंदाही आयआरएस प्रणाली राबविण्यात येणार आहे. त्यात संपुर्ण महसूल यंत्रणा राबणार आहे.
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्या पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी यात्रेत देशभरातून कानाकोपर्यातून भाविक येत असतात. भाविकांना सोईसुविधा देण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर राहणार आहे. त्यात मागील वर्षापासून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीही शासनाच्या ताब्यात असल्याने प्रशासनावर दुहेरी जबाबदारी राहणार आहे. गतवर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कल्पनेतून आषाढी वारीत आयआरएस प्रणाली राबविण्यात आली होती. त्यात जिल्हाधिकार्यांपासून ते शेवटच्या कर्मचार्यांपर्यंत सर्वांना आषाढीच्या कामात गुंतविण्यात आले होते. ६५ एकरातील सोईसुविधा, पालखी मार्गावर सुविधा, मुक्काम तळावर सुविधा आणि सुलभ दर्शन यासाठी चोख नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे वारकर्यांना सुखद वारी अनुभवयाला आली. त्यामुळे यंदाही आयआरएस प्रणाली राबविण्यात येणार आहे. त्यात यंदा राज्य शासन नमामि चंद्रभागा उपक्रमातून पंढरपूरकडे विशेष लक्ष देत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतर मंत्र्यांचेही पंढरपूरकडे लक्ष आहे. त्यामुळे यंदाची वारी वेगळी वारी असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनीही वारीकडेच लक्ष केंद्रीत केले आहेत. त्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांच्यावरच यंदाही आयआरएस प्रणालीची जबाबदारी राहणार आहे. त्यासाठी पंढरीत बैठका घेण्यात येत आहे. ज्या ज्या तालुक्यातून पालख्या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतात, त्या त्या तालुक्यातील अधिकार्यांवर स्वच्छतेची आणि सोईसुविधेची जबाबदारी राहणार आहे. वारकर्यांना अडचणी येणार नाही, याची संपुर्ण दक्षता येण्यात येत आहे. वारकर्यांसाठी आपत्कालीन मदत केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यातून तात्काळ सुविधा देण्यात येणार आहे.