सोलापूर महापालिका एमआयएमच्या गटनेतेपदी रियाज खरादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 03:37 PM2019-11-28T15:37:18+5:302019-11-28T15:40:13+5:30
शायरी अंदाजामुळे सतत राहतात चर्चेत; महापौरपदाबाबत लवकरच ठरविणार भूमिका
ख़ुदी को कर बुलंद इतना कि हर तक़दीर से पहले
ख़ुदा बंदे से ख़ुद पूछे बता तेरी रज़ा क्या है...!
सोलापूर : महापालिकेतील एमआयएमच्या गटनेतेपदी नगरसेवक रियाज खरादी यांची निवड करण्यात आली आहे. एमआयएचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या निर्देशानुसार एमआयएमचे राष्ट्रीय महासचिव पाशा कादरी यांनी खरादी यांना गुरुवारी निवडीचे पत्र पाठविले आहे.
दरम्यान, जिल्हा निरीक्षक अन्वर सादात यांनी रियाज खरादी यांच्या नावाची शिफारस केली होती. रियाज खरादी प्रभाग १४ ड मधून निवडून आले आहेत. एमआयएमचे गटनेतेपद नगरसेविका नूतन गायकवाड यांच्याकडे होते. त्यांना अडीच वर्षांसाठी नेमण्यात आले होते. त्यांचा कालावधी संपल्यानंतर रियाज खरादी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हिंदी, उर्दू आणि मराठी भाषेतील अनोख्या लेहेजातून रियाज खरादी महापालिकेच्या सभागृहात भाषण करीत असतात. महापालिकेत एमआयएमचे आठ नगरसेवक आहेत. या सर्वांना नगरसेवकांना सोबत घेऊन एमआयएम शहर विकासाच्या मुद्यावर अग्रेसर राहील. महापौर निवडीबाबत लवकरच पक्षाची भूमिका जाहीर करु, असा विश्वास खरादी यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केला.