पोषण आहार मधील तांदूळ प्लास्टिक नव्हे ते फोर्टीफाईड 

By दिपक दुपारगुडे | Published: March 23, 2023 12:54 PM2023-03-23T12:54:42+5:302023-03-23T12:55:53+5:30

सोलापूर जिल्ह्यात अनेक वेळा लोंकानी प्लॅस्टिक तांदुळाबाबत शंका उपस्थित केली आहे.

rice in nutrition is fortified not plastic | पोषण आहार मधील तांदूळ प्लास्टिक नव्हे ते फोर्टीफाईड 

पोषण आहार मधील तांदूळ प्लास्टिक नव्हे ते फोर्टीफाईड 

googlenewsNext

दीपक दुपारगुडे, सोलापूर : नुकतेच सोलापुरातील  सांगोला तालुकयातील शाळेतील पोषण आहारमध्ये प्लास्टिक तांदूळ मिळाले म्हणून राज्यभर चर्चा विषय ठरला. मात्र अंगणवाडी व शालेय पोषण आहार मध्ये दिले जाणारे फोर्टीफाईड तांदूळ आहे. रेशन दुकानातून मिळणाऱ्या तांदळामध्ये १०० तांदळाच्या मागे एक फोर्टीफाईड तांदूळ असे मिक्स पद्धतीने वाटप केले जात आहे.

मात्र या तांदुळावर प्रक्रिया केलेली असल्याने पाण्यावर तरंगतो तसेच शिजवतानाही इतर तांदळांपेक्षा पाण्यापासून वेगळा होतो. त्यामुळे अनेक नागरिकांमध्ये हा तांदूळ प्लास्टिकचा असल्याची शंका निर्माण झाल्याने शिजवताना पाण्यातून बाहेर काढून टाकला जात आहे. इतर तांदळापेक्षा वेगळा दिसणारा तांदूळ फर्टीफाईड आहे. थॅलेसेमिया, सिकलसेल, अ‌ॅनिमिया या आजारांसाठी उपयुक्त असल्याने शंभर तांदळा मागे एक असे मिक्स करून शासनातर्फे दिले जात आहे. 

काय म्हणतात अन्न, औषेध प्रशासन 

सोलापूर जिल्ह्यात अनेक वेळा लोंकानी प्लॅस्टिक तांदुळाबाबत शंका उपस्थित केली आहे. त्यानुसार तांदळाची पडताळणी केली असता कांहीही तथ्य आढळलेलं नाही. अद्याप जिल्ह्यात कोठे ही प्लॅस्टिक तांदूळ आढळला नाही. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: rice in nutrition is fortified not plastic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.