शाळेतली पोर तांदूळ अन् डाळीनं झाली मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:21 AM2021-03-28T04:21:19+5:302021-03-28T04:21:19+5:30

शालेय पोषण आहार योजना २०२०-२१ मध्ये ४७५ शाळेतील विद्यार्थ्यांना २०० दिवसांचा पौष्टिक आहार म्हणून तांदूळ व दोन प्रकारच्या डाळीचे ...

The rice at school was made of rice and pulses | शाळेतली पोर तांदूळ अन् डाळीनं झाली मालामाल

शाळेतली पोर तांदूळ अन् डाळीनं झाली मालामाल

Next

शालेय पोषण आहार योजना २०२०-२१ मध्ये ४७५ शाळेतील विद्यार्थ्यांना २०० दिवसांचा पौष्टिक आहार म्हणून तांदूळ व दोन प्रकारच्या डाळीचे वाटप करण्यात आले. यामध्ये झेडपीच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने या विद्यार्थ्यांना साहाजिकच झुकते माप मिळाले. सध्या जानेवारी ते एप्रिलपर्यंत मिळणारा पोषण आहार वाटप प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळालेल्या एकूण मालात वाढ होणार आहे.

कोट :::::::::::

यावर्षी कोरोनामुळे पोषण आहार शिजवणे बंद असल्याने थेट विद्यार्थ्यांपर्यंत वाटप करण्यात आले. मागणीप्रमाणे प्रतिविद्यार्थी दिला जाणारा पोषक आहार नियमानुसार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षकांनी परिश्रम घेतले. सध्या शेवटच्या टप्प्यातील पोषक आहाराचे वितरण केले जात आहे.

- गुरुलिंग नकाते,

शिक्षण विस्तार अधिकारी

असा मिळाला पोषण आहार

एप्रिल ते मे या कालवधीत इयत्ता पहिली ते पाचवी ३४ दिवसात ३१ हजार १३३ विद्यार्थ्यांसाठी १ लाख १७ हजार ५०० किलो, इयत्ता ६ ते ८ मधील २१ हजार ८९४ विद्यार्थ्यांना १ लाख १६ हजार १५० किलो, जून ते ऑगस्ट ३१ हजार २४३ विद्यार्थ्यांना १ लाख ९८ हजार ३५० किलो, २१ हजार ८४० विद्यार्थ्यांना २ लाख ७५० किलो, सप्टेंबर-नोव्हेंबरसाठी ३१ हजार ३३९ विद्यार्थ्यांना १ लाख ८७ हजार ३०० किलो, २१ हजार ९२१ विद्यार्थ्यांना १ लाख ८८ हजार ५५० किलो, डिसेंबर ते जानेवारी ३१ हजार ४१८ विद्यार्थ्यांना १ लाख ६६ हजार ३३५ किलो व २१ हजार ७६६ विद्यार्थ्यांना १ लाख ६५ हजार ९५० किलो मालाचे वाटप करण्यात आले.

Web Title: The rice at school was made of rice and pulses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.