सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर रिक्षा चालकांचा मोर्चा; फिटनेस प्रमाणपत्रच्या दंडविरोधात उभारलं आ
By शीतलकुमार कांबळे | Published: July 3, 2024 02:14 PM2024-07-03T14:14:00+5:302024-07-03T14:14:21+5:30
मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार असल्याचे आंदोलनकारी रिक्षा चालकांनी म्हटलं आहे.
सोलापूर : फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या रिक्षांना दंड लागू झाला आहे. ज्या रिक्षाचालकांनी गेल्या सहा वर्षांपासून फिटनेस सर्टिफिकेट काढले नाही. त्यांना दररोज पन्नास रूपयांप्रमाणे दंड आकारण्यात येणार आहे. या विरोधात रिक्षा चालक संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.
फिटनेस सर्टिफिकेट न काढलेल्या सोलापुरातील सहा हजार रिक्षाचालकांना ते जेव्हा हे सर्टिफिकेट काढण्यासाठी अर्ज करतील तेव्हा त्यांना गेल्या आठ वर्षांचा दररोज पन्नास रूपये या प्रमाणे ४० कोटी रूपयांचा दंड भरावा लागणार आहे. शासनाच्या या आदेशामुळे सोलापुरातील रिक्षाचालक संतापले असून, त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
या मोर्चामध्ये शेवटच्या संख्येने पुरुषांचालक रिक्षा चालक सहभागी झाले. दुपारी १२ वाजता वाजता माजी आमदार नरसय्या आडम मास्तर व सिटू चे राज्य सचिव सलीम मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली चार हुतात्मा पुतळा येथे अभिवादन करून मोर्चास सुरुवात झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा,सिध्देश्वर मंदीर पासपोर्ट ऑफिस मार्गे जिल्हा परिषद पूनम गेट येथे मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले.
मागण्या मान्य न झाल्यास १६ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्यात येणार आहे. सोलापुरात मुख्यमंत्री नाही भेटले तर रिक्षा घेऊन पंढरपूर येथे घेराव घालू असा निर्धार सभेत करण्यात आला.