वाजणारा भोंगा, निघणारा धूर कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:49 AM2021-02-05T06:49:34+5:302021-02-05T06:49:34+5:30

बंद असलेल्या शंकर सहकारीचं काय होणार? हा प्रश्न गेली पाच वर्षे अनुत्तरित होता. तर्कवितर्काच्या भोवऱ्यात सापडलेला व अवसायनात ...

The ringing horn, the emitting smoke energizing the workers | वाजणारा भोंगा, निघणारा धूर कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारा

वाजणारा भोंगा, निघणारा धूर कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारा

Next

बंद असलेल्या शंकर सहकारीचं काय होणार? हा प्रश्न गेली पाच वर्षे अनुत्तरित होता. तर्कवितर्काच्या भोवऱ्यात सापडलेला व अवसायनात चाललेल्या कारखान्याची सल मोहिते-पाटील गटाला कायम होती. सभासद, कामगारांसह पश्चिम भागाची सामाजिक व राजकीय नाळ घट्ट होणे आवश्यक होते. त्यामुळेच सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटलांनी हा साखर कारखाना सुरू करताना ज्या शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी आणला होता. त्यात शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी पहिल्यांदा आला अन् एका नव्या पर्वाला सुरुवात झाली.

कारखाना देणं पै ना पै देणार...

मी कोणावर टीका करणार नाही, मला कोणालाही दोष द्यायचा नाही. कारखाना आजही अनंत अडचणींचा सामना करीत आहे, असे सांगत कारखाना सुरू होण्याचं श्रेय जयसिंह मोहिते-पाटील यांनी पुन्हा रणजीतसिंह मोहिते-पाटील यांना दिले. यावेळी कारखान्याचं देणं देण्याची जबाबदारी माझी असून, सर्वांची पै ना पै देणार असल्याचा विश्वास रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी दिला. ...अन् कानउघाडणी केली

ज्या सभासदांची शंकर कारखान्याला नोंद असून ऊस देणार नाहीत त्यांनी थकीत बिल सध्याच्या संचालक मंडळाला मागू नये. ज्यांच्या काळात ऊस दिला त्यांनाच मागा. शिवाय कारखाना, झेडपी, पंचायत समिती, मार्केट कमिटी यासाठी तिकीट मागायला येणाऱ्या नेतेमंडळींची शंकर अथवा सहकार महर्षीला दिलेल्या उसाची चित्रगुप्ताप्रमाणे नोंद ठेवली जाईल, असा इशारा देत प्रत्येक संचालकाने १ हजार टन ऊस कारखान्याला आणावा, अशी फिरकी घेत परखडपणे कानउघाडणी जयसिंह मोहिते-पाटील यांनी केली.

Web Title: The ringing horn, the emitting smoke energizing the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.