'दरवाढ करा अन्यथा कर्ज तुम्हीच भरा,' रस्त्यावर ओतले दूध; सोलापूरात महामार्ग रोखला
By काशिनाथ वाघमारे | Published: November 19, 2023 04:37 PM2023-11-19T16:37:16+5:302023-11-19T16:39:33+5:30
दूध दराविरोधात सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर कोंडी येथे रस्त्यावर दूध ओतून आंदोलकांनी शासनाचा निषेध केला.
सोलापूर: दूध दराविरोधात सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर कोंडी येथे रस्त्यावर दूध ओतून आंदोलकांनी शासनाचा निषेध केला. नोकऱ्या नाहीत व्यवसाय करावा म्हणून आण्णासाहेब पाटील महामंडळ व इतर ठिकाणाहून कर्ज काढून गाय दुधाचा व्यवसाय सुरू केला मात्र पशुखाद्य ३० रुपये किलो अन् दूध २५ रुपये लिटरने विकले जात असेल तर कर्जाचा हप्ता किती भरायचा? खायचे काय? अन् कुटुंब कसे चालवायचे ते सांगा असा प्रश्न बीबीदारफळ येथील शिवाजी पाटील यांनी सरकारला विचारला.
यावेळी अमोल साठे, आण्णा कदम राम देशमुख, दीपक कदम, ऋतिक पाटील, गणेश नरखेडकर, दयानंद देशमुख, शैलेश साठे, अजय साठे, कुमार पवार, महेश साठे, ऋषीकेश बारसकर, पापा पाटील, सागर चिकणे, वसंत ननवरे, शंभुराजे पाटील, रवीराज देशमुख, महादेव कदम, ज्ञानेश्वर ननवरे, तुकाराम ननवरे, विजय साठे, पृथ्वीराज साठे, तसेच बीबीदारफळ, अकोलेकाटी, रानमसलेचे शेतकरी उपस्थित होते.
'एसटी'चा पॅटर्न राबवा..
प्रचंड तोट्यात असलेले एसटी महामंडळ बंद पडण्याच्या अवस्थेत आले होते. मात्र महिलांना, वृद्धांना प्रवासासाठी सवलत दिल्याने अवघ्या वर्षभरात एसटी नफ्यात आली आहे. त्याप्रमाणेच दुधाचेही नियोजन केले तर एसटी प्रमाणे दूध उत्पादक शेतकरी जगतील असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत म्हणाले.