मेंदूच्या पक्षाघाताचा धोका वाढतोय : डॉ़ जगदीश राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 11:31 AM2018-10-06T11:31:44+5:302018-10-06T11:32:36+5:30

Risk of brain stroke is rising: Dr. Jagdish Rathod | मेंदूच्या पक्षाघाताचा धोका वाढतोय : डॉ़ जगदीश राठोड

मेंदूच्या पक्षाघाताचा धोका वाढतोय : डॉ़ जगदीश राठोड

Next
ठळक मुद्देसेरेब्रल पाल्सी अर्थात मेंदूचा पक्षाघात हा आजार मुख्यत: लहान मुलांमध्ये जन्मजातचया आजाराचे प्रमाण आपल्या भारतात दिवसेंदिवस वाढत चालले आहेभारतातल्या लहान मुलांमध्ये अपंगत्व येण्याचे मुख्य कारण

सेरेब्रल पाल्सी अर्थात मेंदूचा पक्षाघात हा आजार मुख्यत: लहान मुलांमध्ये जन्मजातच असतो. या आजाराचे प्रमाण आपल्या भारतात दिवसेंदिवस वाढत चालले आहे.या रोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी ६ आॅक्टोबर हा जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन पाळला जातो. 
सेरेब्रल पाल्सी हे भारतातल्या लहान मुलांमध्ये अपंगत्व येण्याचे मुख्य कारण आहे. दरवर्षी जन्माला येणाºया १००० मुलांपैकी ३ ते ५ जनांना सेरेब्रल पाल्सी हा रोग होतो.

सेरेब्रल म्हणजे मेंदू आणि पाल्सी म्हणजे अर्धांगवायू हा विकार शारिरीक हालचालीशी संबंधित असून, याच्यात स्रायूची शक्ती, त्यांचे नियमन आणि अतिरिक्त ताठरता यामुळे शरीराच्या हालचालीला मर्यादा येतात. शरीराची हालचाल ही हाडाच्या भोवती असलेल्या स्रायूमुळे शक्य होते. या रोगात स्रायू अगदी कडक होतात किंवा एकदम सैल होतात. यामुळे लहान मुलांचे त्यांच्या हालचालीवरील नियंत्रण सुटते. हालचालीवर मर्यादा येतात. ही लक्षणे स्रायूच्या झिजेमुळे नाही तर मेंदूला होणाºया हानीमुळे होतात. 
सेरेब्रल पाल्सी होण्यामागे अनेक बाबी कारणीभूत असू शकतात. त्यातील काही कारणे अशी आहेत. गर्भकाळ किंवा प्रसुतीदरम्यान आईला झालेला घातक जिवाणू किंवा विषाणूचा संसर्ग, मुदतीआधी जन्मलेले बालक व त्याचे वजन कमी असणे, प्रसुतीदरम्यान बाळाला होणाºया गंभीर इजा, बाळ जन्माला आल्यावर लगेच न रडता उशिरा रडणे अथवा बिल्कुलच न रडणे. ज्यामुळे की मुलामध्ये आॅक्सीजन मेंदूपर्यंत पोहोचत नाही व मेंदूला इजा होते.

एकाच वेळी दोन अथवा त्यापेक्षा जास्त मुले जन्मली तर त्यातील काही मुलांना सेरेब्रल पाल्सी असण्याची शक्यता असते. बाळाला होणारे काही रोग जसे कावीळ, मिरगीचे झटके येणे, मेंदूत पाणी जमा होणे, या रोगामुळे सुद्धा मेंदूला इजा होते. गर्भकाळात अमर्यादित उच्च रक्तदाब, मधुमेह, थॉयराईड यासारखे आजार असणे.
सेरेब्रल पाल्सीची लक्षणे
मूल ५ महिन्याचे होऊन देखील त्याने मान पकडलेली नसणे. मूल दहा महिन्याचे होऊनही बिना सहाºयाचे बसू न शकणे. मूल १५ महिन्याचे होऊनही ते उभे न राहणे, चालू न शकणे, चालता-चालता पडणे, मुलाचा एक हात अथवा पाय काम न करणे. शरीराचा विकास वयानुसार कमी होणे. लहान मूल खेळणे आणि कोणत्याही कामात लक्ष न घालणे. मुलाच्या हाताच्या किंवा पायाच्या मासपेशी या कडक अथवा खेचलेल्या असणे. मूल व्यवस्थित बोलू न शकणे. मूल त्याचे डोळे एका ठिकाणी केंद्रीत न करू शकणे. 

सेरेब्रल पाल्सीचे निदान
सीटी स्कॅन, एमआरआय, इईजी करून सेरेब्रल पाल्सीचे निदान केले जाते. आवश्यकता असल्यास काही रक्ताच्या चाचण्याही केल्या जातात. तसेच सेरेब्रल पाल्सीचा ईलाज कोणत्याही एका तज्ज्ञ डॉक्टराकडे जाऊन होत नाही तर यासाठी विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या समुहाकडे जावे लागते. यामध्ये नुरोलॉजीस्टकडून एमआरआय, सीटी स्कॅन तसेच ईईजी करून मुलांच्या हातापायातील ताठरपणा कमी करण्यासाठी औषधे दिली जातात. गरज असलेल्या रुग्णांना बोटॅक्सची इंजेक्शन दिली जातात. यामुळे हातापार्यातील कडकपणा कमी होण्यास मदत होते.

अ‍ॅक्युपेशनल थेरेपिस्ट हे मुलांच्या सर्वांगिण विकासाकडे लक्ष देऊन त्यासाठी काम करतात. यासाठी न्युरो डेव्हलपमेंटल थेरेपी, सेंसरी इंटीग्रेशन थेरेपी याचा उपयोग करतात. हाता-पायातील कडकपणा व्यायामाने कमी करणे. मुलाला दैनंदिन जीवनात स्वावंलबी बनविणे. मासपेशीतील ताकद वाढविणे ही कामे करतात. फिजिओथेरेपीस्ट, स्पीच थेरेपिस्ट, सायकोलॉजिस्ट या विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडूनही या रुग्णांवर उपचार करून रुग्णाला बरे करण्याचे काम केले जाते. अशा प्रकारे सेरेब्रल पाल्सीमुळे अपंगत्व आलेल्या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे.
 -डॉ. जगदीश राठोड
(लेखक थेरेपिस्ट आहेत) 

Web Title: Risk of brain stroke is rising: Dr. Jagdish Rathod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.