पाणी वाटपापेक्षा नदी पुनरुज्जीवन महत्त्वाचे, जग्गी वासुदेव, नदी अभियानाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 04:13 AM2017-09-16T04:13:51+5:302017-09-16T04:14:01+5:30
पाणी वाटपाची धोरणे अनेक आहेत; पण त्यापेक्षाही देशातील ७० टक्क्यांपर्यंत सुकत चाललेल्या नद्यांच्या पुनरूज्जीवनाचे धोरण महत्त्वाचे आहे. आम्ही हे धोरण तयार केले असून, येत्या २ आॅक्टोबर रोजी त्याची संहिता केंद्र सरकारला सुपूर्द करण्यात येईल.
सोलापूर : पाणी वाटपाची धोरणे अनेक आहेत; पण त्यापेक्षाही देशातील ७० टक्क्यांपर्यंत सुकत चाललेल्या नद्यांच्या पुनरूज्जीवनाचे धोरण महत्त्वाचे आहे. आम्ही हे धोरण तयार केले असून, येत्या २ आॅक्टोबर रोजी त्याची संहिता केंद्र सरकारला सुपूर्द करण्यात येईल. हे धोरण मंजूर करणे देशाच्या हिताचे आहे, अशी अपेक्षा सद्गुरू श्री जग्गी वासुदेव यांनी आज येथे व्यक्त केली.
इशा फाऊंडेशनच्या नदी अभियानाचे रात्री येथे स्वागत करण्यात आले. ८५ साधक आणि कार्यकर्त्यांचा सहभाग असलेल्या या अभियानाने पुण्याकडे प्रस्थान ठेवले. पत्रकारांशी बोलताना सद्गुरू म्हणाले की, नदी अभियानाच्या माध्यमातून आम्ही जनजागरण मोहीम हाती घेतली आहे. ३ सप्टेंबर रोजी कोईमतूर येथून या अभियानाचा प्रारंभ झाला. १६ राज्यातून प्रवास करीत कन्याकुमारी ते हिमालय असे अंतर गाठून लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
मिस्ड कॉल द्या!
इशा फाऊंडेशनच्या वतीने तयार करण्यात आलेल्या नदी पुनरूज्जीवनाच्या धोरणाला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळवून देण्यासाठी नागरिकांनी ८०००९८०००९ या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि नद्या वाचविण्यासाठीच्या अभियानात सहभागी व्हावे. - सद्गुरू जग्गी वासुदेव