बार्शी-कुर्डूवाडी रोडवर रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:23 AM2020-12-06T04:23:40+5:302020-12-06T04:23:40+5:30
बार्शी : केंद्र सरकारने पारित केलेले शेतीमाल विक्री कायदा, शेती कायदा व वस्तू कायदा २०२० हे तिन्ही कायदे ...
बार्शी : केंद्र सरकारने पारित केलेले शेतीमाल विक्री कायदा, शेती कायदा व वस्तू कायदा २०२० हे तिन्ही कायदे शेतकरीविरोधी आहेत. हे कायदे रद्द व्हावेत, या मागणीसाठी आणि दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी अ. भा. किसान सभेच्या वतीने बार्शी-कुर्डूवाडी बायपास चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली बायपास रोडवरील चौकात आंदोलन झाले. दिल्लीत दोन महिन्यांपासून आंदोलन होत असून त्यांच्यावर दडपशाही सुरू आहे. याला विरोध करण्यासाठी, अतिवृष्टी नुकसानभरपाई मिळावी, २०१८ चा दुष्काळ निधी मिळावा, २०२० चा खरीप विमा मिळावा, दिवसा वीजपुरवठा व्हावा, स्वाभिमान किसान योजनेचा लाभ मिळावा, शेतीमालाला हमीभाव मिळावा, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. तहसीलदारांचे प्रतिनिधी मंडल अधिकारी उमेश डोईफोडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
दरम्यान, तालुका पोलिसांनी तानाजी ठोंबरे, लक्ष्मण घाडगे, ए. बी. कुलकर्णी, तानाजी जगदाळे यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी सोडून दिले. या आंदोलनासाठी बाळराजे पाटील, राम कदम, पोपट घाडगे, प्रवीण मस्तुद, शिवाजी घाडगे, दत्तात्रय जगदाळे, लहू आगलावे, चारे येथील शेतकरी, आप्पा घाडगे, संतोष माळी, रमेश माळी, भारत भोसले, धनाजी पवार, अनिरुद्ध नकाते, जयवंत आंबिले, शाफीन बागवान, पवन आहिरे, भारत पवार, विकास पवार, बाळासाहेब मस्के, अर्जुन पोकळे, भगवान शिंदे, शिवाजी चव्हाण, मानसिंग निंबाळकर, शमशुद्दीन बागवान, वसीम बागवान, रहमान बागवान यांनी परिश्रम घेतले.
फोटो : ०५ बार्शी स्ट्राईक
रास्ता रोको करताना अ. भा. किसान सभेचे आंदोलनकर्ते.