बार्शी शहरातील रस्ते डांबरीकरण कामाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:24 AM2021-02-24T04:24:13+5:302021-02-24T04:24:13+5:30

बार्शी शहरात तीन वर्षांपासून महत्वाकांक्षी भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. हे काम प्रगतीपथावर असताना विरोधकांनी तक्रारींच्या माध्यमातून ...

Road paving work started in Barshi city | बार्शी शहरातील रस्ते डांबरीकरण कामाला प्रारंभ

बार्शी शहरातील रस्ते डांबरीकरण कामाला प्रारंभ

Next

बार्शी शहरात तीन वर्षांपासून महत्वाकांक्षी भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. हे काम प्रगतीपथावर असताना विरोधकांनी तक्रारींच्या माध्यमातून जाणून-बुजून भुयारी गटारीचे काम बंद पाडले. आता पुन्हा ते सुरु होत असल्याचे आ. राऊत यांनी सांगितले.

नगराध्यक्ष आसिफ तांबोळी यांनी

येणाऱ्या काळात लवकरच बार्शी शहरात सुरू असलेली भुयारी गटार योजना, रस्ते, गटारी, लाईट, बाग-बगीचा, स्वच्छता, विस्तारित भागातील विकास कामे, नागरिकांच्या प्राथमिक गरजा, प्रस्तावित कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगितले.

यावेळी नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष अरूण नागणे, तानाजी गव्हाणे, ॲड. बी. एन. दादा चव्हाण, किसन पवार, महादेव राऊत, बाळासाहेब गव्हाणे, प्रकाश माने, दादासाहेब हांडे, विष्णू गुंड, पोपट पिंगळे, सुभाष गुंड, आबुतालीब शेख, रज्जाक बाबुडे, कुमार डमरे, भाजपा सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष कुंडलिकराव गायकवाड, भारत पवार, संजय पाटील चारेकर, बाबासाहेब मोरे, नागजी कातुरे, गटनेते दीपक राऊत, नागजी दुधाळ, शरद फुरडे-पाटील, कय्युम पटेल, रोहित लाकाळ, ॲड. महेश जगताप, भोला अडसूळ आदी मान्यवर उपस्थित होते. (वा. प्र.)

२३बार्शी रोड

Web Title: Road paving work started in Barshi city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.