सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन; शेतकरी आक्रमक
By Appasaheb.patil | Published: June 19, 2023 02:03 PM2023-06-19T14:03:47+5:302023-06-19T14:04:12+5:30
शेतकऱ्यांनी योग्य मोबदला मिळावा यासाठी केलं आंदोलन
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड व सोलापूर रिंग रोड (तांदुळवाडी ते केगांव) मधील बाधित शेतकऱ्यांनी योग्य मोबदला मिळावा यासाठी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काहीकाळ खोळंबली होती.
रयत क्रांती संघटना, रिंगरोड संघर्ष समिती, कासेगांवच्यावतीने हा रास्ता रोकाे करण्यात आला. शेतकऱ्यांना बाजार भावापेक्षा पाचपट अधिक भाव मिळावा, प्रति गुंठा ३ ते ४ लाख मावेजा मिळावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. जमीन आमच्या हक्काची... नाही कोणाच्या बापाची.. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या शासनाचा निषेध..निषेध.. यासह विविध प्रकारच्या घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. अचानक झालेल्या आंदोलनामुळे वाहतूक खोळंबली होती. यावेळी सोलापूर तालुका पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.