Solapur Sancharbandi; ग्रामीण भागातील अठरा गावातील रस्ते होणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 01:03 PM2020-07-18T13:03:13+5:302020-07-18T13:03:54+5:30
सोलापूर ग्रामीण पोलिसांचे नियोजन; संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिस अलर्ट
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील अकरा आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील सात अशा अठरा गावातील रस्ते संचारबंदी काळात वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
मार्डी ते कारंबा रस्ता, मार्डी ते अकोलेकाटी फाटा, बार्शी रोड, नान्नज ते मार्डी, नान्नज ते अकोलेकाटी फाटा, बार्शी रोड ते मार्डी, बाणेगाव ते कारंबा, बाणेगाव ते भोगाव-सोलापूर रोड, बोरामणी ते संगदरी, संगदरी ते तांदूळवाडी मार्गे सोलापूर. तिºहे ते पाथरी, पाथरी ते बेलाटी सोलापूर. नान्नज ते बीबीदारफळ, बीबीदारफळ ते अकोलेकाटी-सोलापूर रोड. कोंडी ते गुळवंची, कोंडी ते सोलापूर रोड. बक्षीहिप्परगा ते मुळेगाव तांडा, बक्षीहिप्परगा ते दहिटणे-सोलापूर. पाकणी ते शिवणी, शिवणी ते हिरजमार्गे सोलापूर आणि पाकणी ते सोलापूर. सोलापूर ते तुळजापूर महामार्गापासून कासेगाव जाणारा रस्ता, कासेगाव ते उळे मुख्य रस्ता असे बंद करण्यात आलेले रस्ते आहेत.