अक्कलकोट मतदारसंघात २१० किलोमीटरचे होणार रस्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:20 AM2021-02-08T04:20:19+5:302021-02-08T04:20:19+5:30
तिलाटी गेट ते आचेगाव-वळसंग १० किलोमीटर रस्त्यासाठी १० कोटी ७९ लाख रुपये, मुस्ती ते तांदूळवाडी ९ कि.मी.साठी १० कोटी ...
तिलाटी गेट ते आचेगाव-वळसंग १० किलोमीटर रस्त्यासाठी १० कोटी ७९ लाख रुपये, मुस्ती ते तांदूळवाडी ९ कि.मी.साठी १० कोटी ८ लाख, भुरीकवठे ते वागदरी ९ कि.मी.साठी १४ कोटी ४२ लाख, अक्कलकोट स्टेशन ते तोळणूर १६ कि.मी.साठी १७ कोटी ९ लाख असा ५३ कोटी २८ लाख निधी नुकताच मंजूर झाला आहे. यांपैकी काही कामे युद्धपातळीवर सुरू असून, काही कामे निविदा प्रक्रियेत आहेत. हा निधी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून मिळाला आहे.
तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून २०२१ मध्ये घोळसागाव ते झोपडपट्टी अडीच कि.मी.साठी २ कोटी ४ लाख, शावळ स्टेशन ते कल्लहिप्परगे या ४ कि.मी.साठी १ कोटी ५६ लाख, बणजगोळ ते ममनाबद २ कि.मी.साठी १ कोटी २४ लाख, बादोले बुद्रुक ते बादोले खुर्द शिरवळ १ कि.मी.साठी १ कोटी ३९ लाख अशी कामे मंजूर असून, या कामाच्या निविदा प्रक्रिया सुरू आहेत. मागील वर्षी राज्य अर्थसंकल्पात विविध रस्त्यांच्या कामांसाठी १७ कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यास तूर्त स्थगिती दिली होती. ती आता उठविण्यात आली आहे. यामुळे जेऊर-करजगी-तडवळ-कोर्सेगाव : १ कोटी ५९ लाख, मुळेगाव-दर्गनहळळी-धोत्री-हंनुर ४३ कि.मी.साठी १ कोटी, ५२ लाख, उळे-कासेगाव-वडजी-बोरामणी : १ कोटी ६४ लाख, होटगी-औज-इंगळगी-जेऊर : २ कोटी ३९ लाख, सुलेरजवळगे-मंगरूळ-देवीकवठे : १ कोटी २० लाख, साफळे-बादोला-बोरगाव-घोळसगाव : १ कोटी १८ लाख वळसंग ते मुस्ती १२ कि.मी.साठी २२ कोटी ११ लाख. यामुळे वडगाव, दिंडुर, धोत्री अशा पाच गावांना याचे फायदा होणार आहे. तसेच किणी-बोरगाव-वागदरी : ३ कोटी ३० लाख असा तब्बल मागील सव्वा वर्षात ९५ कोटी रुपये रस्ते निधी केंद्र व राज्य शासनाकडून मिळाला आहे. या रस्त्याच्या बांधणीमुळे अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील ४५ गावांची अत्यंत खराब रस्त्यांची कामे मार्गी लागतील.
कोट ::::::::
मी निवडणुकीत प्रचारासाठी फिरत असताना व आमदार झाल्यानंतर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात नागरिकांच्या गाटीभेटीसाठी घेताना नागरिकांच्या तक्रारी या रस्त्याबाबतच्या होत्या. त्यामुळे सव्वा वर्षात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून ७५ कोटी व उर्वरित राज्य सरकारकडून असा जवळपास ९५ कोटींचा निधी उपलब्ध करून घेतला आहे. यांपैकी काही कामे सुरू झाली असून, काही कामे प्रगतिपथावर आहेत. काही कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे.
- सचिन कल्याणशेट्टी
आमदार