पावसाळ्यात नका करू रस्ते, अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:15 AM2021-06-19T04:15:55+5:302021-06-19T04:15:55+5:30
शहरातील बहुतांश रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. संगम चौक ते गायकवाड चौक, पोथरे नाक्याजवळील जुना बायपास, गायकवाड चौक ते ...
शहरातील बहुतांश रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. संगम चौक ते गायकवाड चौक, पोथरे नाक्याजवळील जुना बायपास, गायकवाड चौक ते सारंगकर हॉस्पिटल रोड आदी ठिकाणी कामे चालू आहेत. काही दिवसांपूर्वी व सुरू झालेल्या पावसानी तर खड्ड्यात पाणीच पाणी साचले आहे निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. या रस्त्यावरील रोज वाहतूक व ये-जा करणारे नागरिक खूप आहेत.
वरील रस्त्याने परिसरात वर्दळ असते, संगम चौकातील रस्त्यावरून रोशेवाडी, वीट, पुण्याकडे जाणारे तसेच शिवाजी पुतळ्यापासून नगरकडे जाणाऱ्या मोठ्या बसेस, फोर विलर, टू व्हिलरसारखी वाहत असतात. या रस्त्यावर मोठं-मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे एक मोठे वाहन गेले तर मागील टू व्हिलरला त्रास होत आहे. पडल्यामुळे पाणी अंगावर उडून अपघात वारंवार या भागात होत आहे. या रस्त्यावरून वयोवृद्ध सायकलवरून जाताना यांना खड्डे चुकवावा लागत आहे. खड्डे चुकविताना वारंवार अपघात झालेले आहे. त्यामुळे महिला वयोवृद्ध नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागते.
----
जीव मुठीत घेऊन प्रवास
गायकवाड चौक, टाऊन हाँल चौक, रंभापुरा रस्ता अत्यंत खराब आहे पावसाळा थांबल्यावर उत्तम व दर्जेदार रस्ता करावा या रस्त्यावर जीव मुठीत धरून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर खड्डे आहेत का? खड्ड्यावर रस्त्याचे काम चालू आहे का? पाण्याचे डबके हे लक्षात येत नाही. हा रस्ता पावसाळा संपल्यावर दुरुस्त करावा अन्यथा भारतीय जनता पार्टीच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे यांनी दिला आहे.