तिघांचा खून करून पोलिसांवरील हल्ला करणारा दरोडेखोर जेरबंद, सोलापूर ग्रामीण पोलीसांची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:59 PM2018-02-28T12:59:35+5:302018-02-28T12:59:35+5:30
मोहोळ शहरात १५ दिवसांपूर्वी सोड्डी (ता. मंगळवेढा) येथील दरोडा प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या तिघा पोलीस कर्मचाºयांवर चाकूने प्राणघातक हल्ला चढविलेला आणि पळून जाताना मार्गात आडवा आलेल्या अबूपाशा कुरेशी (वय ४८, रा. मोहोळ) यांचा भोसकून खून करणाºया दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परभणी येथून अटक केली.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २८ : मोहोळ शहरात १५ दिवसांपूर्वी सोड्डी (ता. मंगळवेढा) येथील दरोडा प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या तिघा पोलीस कर्मचाºयांवर चाकूने प्राणघातक हल्ला चढविलेला आणि पळून जाताना मार्गात आडवा आलेल्या अबूपाशा कुरेशी (वय ४८, रा. मोहोळ) यांचा भोसकून खून करणाºया दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परभणी येथून अटक केली. या आरोपीस आज येथे आणून मोहोळ पोलिसांच्या स्वाधीन केले असून त्याला ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश मोहोळ न्यायालयाने दिला.
छग्या उर्फ छगन गंगाराम शिंदे (वय २८,रा. जामगाव खुर्द, ता. मोहोळ) असे अटक केलेल्या दरोडेखोराचे नाव आहे. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी गुन्हे शाखेला विशेष बक्षीस जाहीर केले.
दरोडेखोरांनी सोड्डी (ता. मंगळवेढा) येथे पाच घरांवर दरोडा टाकत कस्तुराबाई रामण्णा बिराजदार (वय ६५) यांचा खून करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविले होते. त्याशिवाय या प्रकरणातील मलकाप्पा रेवगोंडा बिराजदार यांचा दगडाने खून केला. या दरोडेखोरांच्या शोधार्थ अनेक पथके कार्यरत होती. त्यापैकी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली एक पथक दरोडेखोरांच्या मार्गावर होते. आपल्या पथकासह हे पथक मोहोळमधील शिवाजी चौकात दाखल झाले. तेथे तिघांना पकडण्यासाठी जात असताना त्यांनी पोलिसांच्या दिशेने चाकूने वार केले. त्यानंतर त्या ठिकाणी उभ्या असलेल्या अबूपाशा कुरेशी (वय ४८, रा. मोहोळ) यांच्यावरही दरोडेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. यामध्ये अबूपाशा यांचा मृत्यू झाला होता.
दरोडेखोर वैजिनाथ भोसले याला घटनास्थळीच पोलिसांनी पाठलाग करुन अटक केली होती. अन्य दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले होते. आरोपी छगन हा करम शिवार गंगाखेड (जि. परभणी) येथे असल्याची माहिती मिळाली होती. २६ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून दरोडेखोर छगन याला अटक केली. त्यानेच मोहोळ येथे कुरेशी यांच्यावर वार केल्याचे निष्पन्न झाले आहे.
-----------------
यांनी केली कामगिरी
च्पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक हेमंत भंगाळे, पोलीस हवालदार नारायण गोलेकर, विजयकुमार भरले, गोरक्षनाथ गांगुर्डे, पोलीस नाईक रवि माने, पोकॉ अरुण केंद्रे, सागर शिंदे, सचिन गायकवाड, बाळू चमके, राहुल सुरवसे , आनंद दिघे आदींनी केली.
-----------------
आठ गुन्हे दाखल
च्मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोड्डी येथील खुनासह दरोडा या गुन्ह्यात दरोडेखोर छगन शिंदे याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर सोलापूर तालुका, मंगळवेढा, मंद्रुप, दक्षिण आणि उत्तर अक्कलकोट, मोहोळ येथे असे आठ गुन्हे दाखल आहेत. याशिवाय इंडी येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी सांगितले.