सात वर्षापासून फरार असलेला आरोपी ताब्यात; पंढरपूर तालुका पोलीसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 08:42 AM2020-11-10T08:42:47+5:302020-11-10T10:58:54+5:30
सराईत गुन्हेगारावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल;
पंढरपूर : मागील ७ वर्षापासून फरार असलेला सराईत आरोपीस जेरबंद करण्याची कामगिरी तालुका पोलीसांनी केली. या आरोपीविरुध्द २०१३ मध्ये करकंब व एप्रिल २०२० मध्ये पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.
समाधान शरद काळे (विटे, ता. पंढरपूर) विरुध्द विरुध्द २०१३ साली करकंब पोलीस ठाण्याात भादवि कलम ३९५ प्रमाणे गुन्हा आहे. त्याचबरोबर ६ जून २०२० रोजी पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजि क्र. १९२/२० भादवि क ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. व इतर ठिकाणी गुन्हे नोंद आहेत. त्याचबरोबर त्यांच्या विरुध्द पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. तो या सर्व गुन्हयात फरारी होता.
६ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी समाधान शरद काळे हा खरसोळी (ता. पंढरपुर) या ठिकाणी येणार असल्याचे पोनि. किरण अवचर यांना समजले. त्यांनी एक पथक तयार केले. यामध्ये पोनि. किरण अवचर, सपोनि खरात, पोलीस हवालदार बापु मोरे, पोलीस नाईक विनायक क्षीरसागर, देवेंद्र सुर्यवंशी, समाधान भराटे, सोमनाथ नरळे हे आरोपीला पकडण्यासाठी रवाना झाले. यापथकाने खरसोळी पाटी जवळील शिवारात जावुन काळे यांच्या मुसक्या आवळल्या असल्याचे विक्रम कदम यांनी सांगितले.