लूटमार करणारी टोळी मंद्रुपमध्ये सक्रिय

By admin | Published: May 26, 2014 12:22 AM2014-05-26T00:22:58+5:302014-05-26T00:22:58+5:30

दक्षिण सोलापूर : खराब रस्ता आणि अंधाराचा फायदा घेऊन तेरा मैल ते कामती महामार्गावर ट्रकचालकांना म्होरक्यासह पाच सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले

Robbery gangs active in the Mandrup | लूटमार करणारी टोळी मंद्रुपमध्ये सक्रिय

लूटमार करणारी टोळी मंद्रुपमध्ये सक्रिय

Next

दक्षिण सोलापूर : खराब रस्ता आणि अंधाराचा फायदा घेऊन तेरा मैल ते कामती महामार्गावर ट्रकचालकांना लुटणारी टोळी मंद्रुप पोलिसांच्या टप्प्यात आलीत्नटोळीच्या म्होरक्यासह पाच सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. रस्त्यावर ट्रकसमोर दुचाकी आडवी लावून चालकाला लुटण्याचे प्रकार तेरा मैल ते कामती बायपास वाढले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री ट्रकचालकाला मारहाण करुन ३८ हजार ९१० रुपये लुटण्यात आले. चालकाने मंद्रुप एस. टी. स्टँडनजीकच्या डिजिटल बोर्डावरुन संशयितांविरोधात मंद्रुप पोलिसांत फिर्याद दिली. सपोनि प्रकाश रासकर यांनी आठ तासांत दोन आरोपींना अटक केली. संशयितांच्या दुचाकीवरील लोगो फिर्यादीने तंतोतंत पोलिसांना सांगितला. या माहितीच्या आधारे सपोनि प्रकाश रासकर यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. निसार ईलाही बागवान, स्टीव्हन उर्फ योव्हान जेम्स शिंदे (रा. ह. दे. प्रशालेमागे, सोलापूर), विजय रामचंद्र शिंदे (रा. सुशीलनगर) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिघेही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यांच्याकडून अनेक गुन्ह्यांची कबुली मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे..

---------------------------------

या टोळीतील आरोपी संतोष हरिबा राठोड याला घरात आश्रय देऊन पकडायला आलेल्या पोलिसांवरच दगडफेक करुन त्यांना मारहाण के ल्याची घटना कुमठे येथे २४ मे रोजी रात्री ११ वाजता घडली़ घरात आश्रय देऊन पोलिसांवर दगडफेक करणारे सागर नंदकुमार चव्हाण, रवींद्र सुमंत बडवणे, शारदा सुमंत बडवणे यांच्यासह सहा जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ अधिक तपास फौजदार राठोड हे करीत आहेत.

Web Title: Robbery gangs active in the Mandrup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.