दरोड्याचा प्लॅन होता तयार, तयारीही झाली; पण पोलीस गाडी आली अन्‌ बेत फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:15 AM2021-07-24T04:15:17+5:302021-07-24T04:15:17+5:30

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ तानाजी बनसोडे (वय ३२, रा. अनवली, ता. पंढरपूर), संजय ज्ञानेश्वर गडदे (वय २३, रा. गोपाळपूर, ...

The robbery was planned, prepared; But the police car came and the plan failed | दरोड्याचा प्लॅन होता तयार, तयारीही झाली; पण पोलीस गाडी आली अन्‌ बेत फसला

दरोड्याचा प्लॅन होता तयार, तयारीही झाली; पण पोलीस गाडी आली अन्‌ बेत फसला

Next

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ तानाजी बनसोडे (वय ३२, रा. अनवली, ता. पंढरपूर), संजय ज्ञानेश्वर गडदे (वय २३, रा. गोपाळपूर, ता. पंढरपूर), बिरुदेव शिवाजी कोकरे (वय ३५, रा. अनवली, ता. पंढरपूर), शरद शिवाजी गांजाळे (वय ३६, रा. अनवली, ता. पंढरपूर), प्रवीण अशोक मेटकरी (वय २५, रा. गोपाळपूर, ता. पंढरपूर) हत्यारासह गोपाळपूर रोडवरील सीमोल्लंघन रिद्धी-सिद्धी गणपती मंदिर परिसरात थांबले होते. ही खबर मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, हवालदार, पोह. शरद कदम, राजेंद्र गोसावी, सूरज हेंबाडे, इरफान मुलाणी, सुनील बनसोडे, सुजित जाधव, महेश पवार, इरफान शेख, शोएब पठाण, विनोद पाटील, संजय गुटाळ, समाधान माने, अर्जन कवळे हे पोलीस कर्मचारी व अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले.

संबंधित व्यक्तींना पकडण्याचा प्रयत्न केला, यावेळी चौघे पोलिसांच्या तावडीत आले; परंतु प्रवीण अशोक मेटकरी हा पळून गेला. पकडलेल्या चौघांची चौकशी केली असता ते सर्वजण पंढरपूर शहरातील गाताडे प्लॉट व परदेशीनगर येथील उच्चभ्रू वस्तीत दरोडा टाकणार असल्याची माहिती समोर आली. गुरुवारी प्रवीण मेटकरी याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास सपोनि. राजेंद्र मगदूम करत आहेत.

----

तलवार, कोयता जप्त

या कारवाईत एमएच १२ पीसी ११३६ व एमएच ४२ के ५९०७ ही दोन वाहने, कोयता, लोखंडी हुक, तलवार असा एकूण ९ लाख २० हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पाचही जणांना पोलीस काेठडी

सोमनाथ तानाजी बनसोडे, संजय ज्ञानेश्वर गडदे, बिरुदेव शिवाजी कोकरे, शरद शिवाजी गांजाळे यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले तर त्यांना शनिवारपर्यंत व प्रवीण अशोक मेटकरी याला शुक्रवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यालाही शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

----

यापूर्वीही केले गंभीर गुन्हे

अवैध सावकारकी व मारहाणप्रकरणी संजय ज्ञानेश्वर गडदे, बिरुदेव शिवाजी कोकरे, प्रवीण अशोक मेटकरी यांच्याविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहीती पोनि. अरुण पवार यांनी दिली.

----

Web Title: The robbery was planned, prepared; But the police car came and the plan failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.