Good News; सोलापुरातील कोरोना ग्रस्तांच्या सेवेसाठी आता ‘रोबोट’

By appasaheb.patil | Published: May 6, 2020 02:44 PM2020-05-06T14:44:29+5:302020-05-06T14:47:15+5:30

रेल्वे हॉस्पीटलची निर्मिती; औषध, गोळ्यासह जेवणही पोहचविणार

'Robot' now to serve Corona victims in Solapur | Good News; सोलापुरातील कोरोना ग्रस्तांच्या सेवेसाठी आता ‘रोबोट’

Good News; सोलापुरातील कोरोना ग्रस्तांच्या सेवेसाठी आता ‘रोबोट’

Next
ठळक मुद्देदेशासह संपूर्ण जगात कोरोना या विषाणूजन्य आजाराने चांगलेच थैमान घातलेकोरोनाला हरविण्यासाठी देशातील सर्वच यंत्रणा अहोरात्र काम करीत आहेत़गर्दीमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी सर्वच पातळीवर विविध उपाययोजना

सोलापूर : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपुर उपयोग करून रेल्वे प्रशासनाने सोलापुरातील ‘कोरोना’ग्रस्त रूग्णांच्या सेवेसाठी रोबोटची निर्मिती केली आहे़ हा रोबो उपचार घेत असलेल्या रूग्णांना औषधे, गोळ्यांसह जेवणही पोहचविणार आहे़ आता सोलापुरातही उच्च दर्जाचे तंत्रज्ञान विकसित होत असल्याने सोलापूरचा नावलौकिक होत आहे़ रेल्वेने तयार केलेला हा देशातील पहिलाच रोबोट असल्याचेही रेल्वे प्रशासनाने सांगितले.

देशासह संपूर्ण जगात कोरोना या विषाणूजन्य आजाराने चांगलेच थैमान घातले आहे.  कोरोनाला हरविण्यासाठी देशातील सर्वच यंत्रणा अहोरात्र काम करीत आहेत. गर्दीमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी सर्वच पातळीवर विविध उपाययोजना व तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवेनवे तंत्र विकसित करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने कोरोनाग्रस्त रूग्णांच्या सेवेसाठी आता रोबोटची निर्मिती केली आहे. सोलापूर रेल्वे विभागातील यांत्रिक विभागाने अवघ्या तीन दिवसांत हा रोबोट तयार केला आहे.

सोलापूर रेल्वे स्थानकाच्या पाठीमागे असलेल्या आयओएच डेपो मध्ये हा विकसित झाला. ही माहिती रेल्वे हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. आनंद कांबळे यांनी सांगितले. हा रोबोट मंगळवार ५ मे रोजी भैय्या चोकातील रेल्वे हॉस्पीटलमध्ये दाखल झाला आहे़ हा रोबोट मोबाईलव्दारे आॅपरेट करण्यात येणार आहे़ याशिवाय रूग्णांच्या नातेवाईकांशीही व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे संवादही साधण्यासाठी हा रोबो मदत करणार आहे़ रोबोटमुळे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी,नर्स, सफाई कामगार यांना कोरोना रुग्णाच्या संपर्कात येऊन लागण होण्याची शक्यता कमी होण्यास मदत झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाºयांची चिंता कमी करणारी ही बाब ठरणार आहे.

-----------------
रूग्णांचे मनोर्धर्य वाढविण्यासाठी रोबो साधणार संवाद
कोरोना बाधित रुग्णांची स्थिती कशी आहे हे जाणून घेण्यासाठी दरवेळेस डॉक्टरांना वॉर्ड मध्ये येण्याची गरज भासणार नाही. रोबोट कोरोना बाधित रुग्णांना औषधे देणार आहे. यात आॅडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा असल्याने त्याद्वारे तो रुग्णांशी संवाद साधणार आहे.  रोबोटद्वारे डॉक्टर रुग्णांवर नजर ठेवू शकतील. रुग्णांचे मनोधैर्य खचू नये म्हणून रोबोट त्यांच्याशी संवाद साधणार असून प्रसंगी नातेवाईकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलू आणि पाहू ही शकणार आहे.
----------------
रोबोटमुळे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांना कोरोना बाधित कर्मचाºयांच्या संपर्क कमीत कमी येईल. परिणामी डॉक्टर व कर्मचारी यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका खूप कमी होईल. २४ तास रोबोट रुग्णांची सेवा करणार आहे. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाºयांंवरील ताण हलका होण्यास मदत होणार आहे. एकूणच रोबोट कर्मचाºयांना बºयाच आजारापासून दूर ठेवणार आहे.
डॉ. आनंद कांबळे,
प्रमुख, रेल्वे हॉस्पीटल, सोलापूर
---------------
रेल्वेतील कोरोना बाधित रूग्ण लवकर बरे होतील
सोलापूर शहरात आढळून आलेले १९ कोरोना बाधितांवर रेल्वेच्या हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत़ या रूग्णांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रेल्वे हॉस्पीटलचे सर्व वैद्यकीय अधिकारी प्रयत्न करीत आहेत़ शिवाय वेळेवर सकस आहार, गोळ्या, औषधोपचार, स्वच्छतेबाबतची काळजी, रूग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी विविध उपाययोजना, कार्यक्रम राबविण्यात येत आहे़ रेल्वे हॉस्पीटलमधील कोरोना बाधित रूग्ण लवकरच कोरोनावर मात करून घरी परततील असा विश्वास मध्य रेल्वे सोलापूर मंडलचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केला़

Web Title: 'Robot' now to serve Corona victims in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.