रोहित पवारांची राज ठाकरेंवर खोचक टीका; सांगितली मनसेप्रमुखाची 'स्टाईल'
By Appasaheb.patil | Published: February 7, 2023 02:46 PM2023-02-07T14:46:58+5:302023-02-07T14:47:18+5:30
रोहित पवारांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद; राजकीय नेत्यांच्या घेतल्या गाठीभेटी
सोलापूर : पुण्यातील कसबा मतदारसंघात उमेदवार देताना टिळक कुटुंबीयांवर अन्याय केला. या मतदारसंघात मनसेची ताकद असल्याचे मला समजले. राज ठाकरे या निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी भाजपच्या प्रभावाखाली घेतला. राज ठाकरे यांची स्वत:ची स्टाईल आहे. भाजपच्या प्रभावाखाली त्यांची स्टाईल हरवत आहे असा आरोप आ. रोहित पवार यांनी केला.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार हे सोलापूर शहरात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. याचवेळी भाजपने त्यांच्या ओबीसी नेत्यांची ताकद कमी केली, असा आराेपही पवार यांनी केला. उद्याेगपती गाैतम अदानींबाबत विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले, हिंडेनबर्गसारख्या कंपनीने स्वतःच्या फायद्यासाठी असे उद्योग सुरू केले आहेत. अदानीसारख्या कंपनीचे शेअर्स पडले की ते खरेदी करायचे आणि आपला फायदा करून घ्यायचा. पुन्हा जादा दराने विक्री करायची असे उद्याेग ही संस्था करते. देशात राेजगार देण्यात अदानी चाैथ्या क्रमांकावर आहेत. गुंतवणुकीवर परिणाम झाला तरी अदानींनी काेणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून काढू नये असेही त्यांनी मत व्यक्त केले.
सोलापूर येथील लोकसभेच्या जागेवर बाबतही त्यांनी विधान केले. ते म्हणाले की, महाविकास आघाडीची लवकरच बैठक हाेणार आहे. महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांना विश्वासात साेलापूर लाेकसभेची जागा काेणाला द्यायची याचा निर्णय हाेईल. हा निर्णय लवकर झाल्यामुळे कार्यकर्त्यांना काम करताना अडचण राहणार नसल्याचेही स्पष्ट केले.