अत्यावश्यक सेवेसाठी ग्राम सुरक्षा दलाची भूमिका महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:25 AM2021-09-22T04:25:45+5:302021-09-22T04:25:45+5:30
माढा येथे ग्राम सुरक्षा दलाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी संताजी पाटील, सहायक पोलीस निरीक्षक ...
माढा येथे ग्राम सुरक्षा दलाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी संताजी पाटील, सहायक पोलीस निरीक्षक श्याम बुवा, विक्रमसिंह घाडगे, पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे, महंमद शेख आदी उपस्थित होते.
यावेळी विक्रमसिंह घाडगे म्हणाले ग्राम सुरक्षा दलाच्या या यंत्रणेमुळे चोरी, दरोडा यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपी जागेवर जेरबंद होण्यास तात्काळ मदत मिळणार आहे. पुणे, नाशिक, सातारा, अहमदनगर जिल्ह्यांतील साडेतीन हजारांहून अधिक गावे व ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाली आहेत, तर या यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात लाभ नागरिकांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्राम सुरक्षा दलाचे संचालक डी. के. गर्डी यांनी यावेळी प्रात्यक्षिक दाखवले. प्रास्ताविक सहायक पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्षा मिनल साठे, माजी झेडपी सदस्य झुंंजार नाना भांगे, सरपंच ऋतुराज सावंत, उत्तम सुतार, माजी सभापती कल्पना जगदाळे, सुप्रिया बंडगर, अनिता सातपुते, शिवाजी जगदाळे, दिनेश जगदाळे, सचिन घाडगे, नागनाथ घाडगे, शिवाजी ढेकळे, शंभू साठे, दत्ता अंबुरे, पोलीस पाटील हौसाजी पाटील, दिगंबर रणदिवे, सुनीता शिंदे, मनीषा सुरवसे, अनिता लोभे आदींची उपस्थिती होती.
210921\1629-img-20210921-wa0031.jpg
ग्राम सुरक्षा दलाच्या कार्यक्रमाचे आयोजन शहरातील तुळजाभवानी मंगल कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी विक्रमसिंह घाटगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार राजेश चव्हाण गटविकास अधिकारी संताजी पाटील साहेब पोलीस निरीक्षक श्याम बुवा उपस्थित होते.